Press "Enter" to skip to content

राष्ट्रीय वारकरी परिषदेची मागणी

छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांविरोधात राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्वरित अटक करा

सिटी बेल लाइव्ह / नागोठणे (महेश पवार) :

हिंदवी स्वराज्य निर्माते, महाराराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान अग्रीमा जोशुवा या कुठल्यातरी नटीने केल्याची माहिती समोर येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण जगात असलेल्या हिंदूंचा स्वाभिमान आहे. मंदिरे पाडणाऱ्या अफझलखानाला ठार करून धर्म रक्षण करणारे भगव्या ध्वजाचे जगाच्या नकाशावर हिंदवी स्वराज्य निर्माण करणारे ते एकमेव राजे आहेत. त्यांचा अवमान करणाऱ्यावर शासनाने राष्ट्रद्रोहाचा गुन्हा नोंदवून त्वरित अटक करावी. अशी मागणी राष्ट्रीय वारकरी परिषदेच्या वतीने प्रसिद्धी पत्रकामार्फत करण्यात आली आहे.

राष्ट्रीय वारकरी परिषदेचे कार्याध्यक्ष ह. भ. प. बापूमहाराज रावकर यांनी प्रसिद्धि पत्रकात म्हटले आहे की, या देशात हे मस्तावलेले कलाकार, गायक, वादक फक्त हिंदूंचे देव संत व्रत ग्रंथ परंपरा महापुरुष यांची सातत्याने टिंगल टवाळी करीत असतात. मात्र मुसलमान व अन्य धर्मियांच्या बाबतीत यांची अशी हिमंत होत नाही. अशी जर टिंगल अन्य धर्मियांच्या बाबतीत केली असती तर आतापर्यंत फतवे निघाले असते कायदा मोडून या अपमान करणाऱ्यांना धडा शिकविला असता. यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मस्ती फक्त हिंदूवरच चालते ती सरकारने जिरवावी अशी आमची विनंती आहे.

हिंदूहृदय सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच हिंदू देवींचे विडंबन करणारा एम एफ हुसैन पळाला होता. आ मुख्यमंत्री श्री उद्धवजी यांनी अशा नतभ्रष्ट लोकांना वठणीवर आणण्यासाठी कठोर कारवाई करून छत्रपती शिवरायांचा अवमान करण्याचे धाडस महाराष्ट्रात कुणीच करणार नाही हे दाखवून द्यावे.

मुसलमानांच्या बाबतीत वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या आरोपावरून याच देशात कायदा संविधान धाब्यावर बसवून फतवे निघाले व उत्तर प्रदेश मध्ये कमलेश तिवारी यांची त्यांच्या घरात घुसून हत्या करण्यात आली. हिंदूंचा रोज अपमान करणाऱ्यांना मात्र हिंदूंचीही भीती नाही व ज्या कायद्याच्या भरवश्यावर आज पर्यंत हिंदू समाज विश्वास दाखवीत आला आहे.त्या कायद्याने तर या हिंदूंचा अपमान करणाऱ्याना परवानेच मिळाल्यासारखे हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली अपमान करतात मात्र यापुढे हिंदू समाज हे कदापिही खपवून घेणार नाही.असे शेवटी ह भ प बापू महाराज रावकर यांनी स्पष्ट केले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.