सिटी बेल लाइव्ह । राजेश बाष्टे । अलिबाग । 🔷🔶🔷
मुरुड भंडारी समाजातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गजानन गणपत रांजणकर यांचे सोमवार दि 5 ऑक्टोबर 2020 रोजी अलिबाग-विजयनगर येथील निवासस्थानी अल्पशा आजाराने निधन झाले. ते 72 वर्षांचे होते. पत्रकार भारत रांजणकर व संतोष रांजणकर यांचे ते वडील होत.
त्यांच्या पश्चात पत्नी, वहिनी, दोन मुले, मुलगी, सुना, जावई, पुतणे, नातवंडे असा मोठा परिवार आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. गजानन रांजणकर यांना काही दिवसांपूर्वी अर्धांगवायूचा विकार झाला होता. त्याच्यावर उपचार सुरू होते. आजारातून प्रकृती सुधारत असतानाच सोमवारी आलेल्या हृदयविकाराच्या जोरदार धक्क्याने त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांच्या पार्थिवावर वरसोली बुरुमखान येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मुरुडच्या नगराध्यक्ष स्नेहा पाटील, नगरसेवक विजयनाना पाटील, मुरुड भंडारी समाजाचे विश्वस्तसुरेश कासेकर, मुरुड भंडारी युवक संघटनेचे अध्यक्ष अरविंद पाटील, वरसोली ग्रामपंचायत माजी सदस्य संतोष घरत यांच्यासह अलिबाग येथील पत्रकार वर्ग व अनेकजण उपस्थित होते.
कष्टप्रद आयुष्य व्यथित केलेल्या गजानन रांजणकर हे मुरुड भंडारी समाजातील एक ज्येष्ठ मार्गदर्शक होते. मनमिळावू, खेळकर स्वभावाचे असलेले रांजणकर हे समाज कार्यात हिरीरीने सहभाग घेत असत.
अयोध्या येथील कारसेवेत विश्व हिंदू परिषदेचे नेते स्व व्यंकटेश आबदेव यांच्या समवेत त्यांनि सक्रिय सहभाग घेतला होता. त्यासाठी त्यांनी तुरुंगवास देखील भोगला. मुरुड परिसरात अयोध्या वीर म्हणून ते सुपरिचित होते. त्यांच्या निधनाने अनेकांनी दुःख व्यक्त केले आहे. त्यांचे उत्तरकार्य मुरुड एकदरा येथील निवासस्थानी करण्यात येणार असल्याचे रांजणकर कुटुंबीयांनी सांगितले.








Be First to Comment