माजी आमदार माणिकराव जगताप यांची मागणी
सिटी बेल लाइव्ह / रायगड (धम्मशिल सावंत)
महाराष्ट्रात आणि देशात जशी करोना बाधित रुग्णांची संख्या धक्कादायकरीत्या वाढत आहे , त्याचप्रकारे रायगड जिल्ह्यात देखील रुग्णसंख्येचा स्फोट होताना दिसत आहे. पूर्वी करोनाचा शहरी भागाला अधिक घट्ट विळखा होता, मात्र आजघडीला ग्रामीण भाग देखील करोनाची शिकार बनला आहे. रायगड जिल्ह्यात करोना बाधितांचा आकडा साडेसात हजारांच्या पार गेला आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात दहा दिवसाचा लॉक डाऊन घोषीत करण्यात आला. मात्र
रायगड जिल्हा लॉकडाऊन मध्ये जिल्ह्यातील कारखाने शंभर टक्के बंद ठेवा अशी जोरदार मागणी माजी आमदार माणिकराव जगताप यांनी केली. लॉक डाऊन हा आता कालबाह्य झाला आहे. लॉक डाऊनने आपण फार मोठं काही साध्य करू अस नाही, रुग्णांची संख्या वाढते आहे, तरीदेखील जनजीवन सुरळीत आहे. मागील सहा महिने नागरिकांनी खूप त्रास सहन केला आहे. एकीकडे जनतेसाठी लॉक डाऊन केला जातो, मात्र दुसरीकडे जिल्ह्यातील सर्व कंपन्या राजरोसपणे सुरू ठेवल्या जातात. आजघडीला अनेक कंपन्यामधून कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे लॉक डाऊन मध्ये कारखान्यांचा समावेश असावा, अन्यथा लॉक डाऊन नसावा अस मत जगताप यांनी व्यक्त करून रायगड जिल्हा लॉकडाऊन मध्ये जिल्ह्यातील कारखाने शंभर टक्के बंद ठेवावेत अशी मागणी माजी आमदार तथा काँग्रेस रायगड जिल्हा अध्यक्ष माणिकराव जगताप यांनी केली आहे.
बाईट 1, माणिकराव जगताप, माजी आमदार तथा अध्यक्ष रायगड जिल्हा काँग्रेस






Be First to Comment