सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार । 🔷🔶🔷
नागोठण्यातील शांतीनगर भागातील रहिवासी जयश्री दत्ताराम झोलगे (वय ६८) यांचे पेण येथील खासगी रूग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले. सार्वजनिक बांधकाम खात्याचे निवृत्त कर्मचारी दत्ताराम (तात्या) झोलगे यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्या पश्चात दिनेश हा विवाहित मुलगा, सौ. वैशाली दिघे, सौ. वर्षा अटकोल, सौ. माधुरी खरीवले व सौ. पल्लवी गोळे या चार विवाहित मुली, सुन, जावई, नातवंडे यांच्यासह मोठा परिवार आहे.
दिवंगत जयश्री झोलगे या खुप प्रेमळ स्वभावाच्या होत्या. त्यांनी सुकेळी येथील बालवाडी मध्ये शिक्षिका म्हणून काही वर्षे बाल मनावर संस्कार करण्याचे बहुमोल कार्य केले होते. त्यांच्या पार्थिवावर येथील अंबा घाटावरील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांचे आप्तेष्ट, नागोठणे शहर व विभागातील नागरिक तसेच समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कै. जयश्री झोलगे यांचे दशक्रिया विधी सोमवार १२ आॅक्टोबर रोजी तर उत्तरकार्य गुरुवार १५ आॅक्टोबर रोजी होणार असल्याची माहिती झोलगे कुटुंबियांकडून देण्यात आली.








Be First to Comment