शिवसेना मा.नगरसेवक प्रथमेश चंद्रशेखर सोमण यांचा पुढाकार
संपूर्ण भाग केला सॅनिटाइझ आणी डीसइनफेक्ट : गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
सिटी बेल लाइव्ह / पनवेल (वार्ताहर) #
सध्याच्या कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे त्याचप्रमाणे पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे अशोक बाग झोपडपट्टी परिसरातील नागरिकांचे मोठे हाल झाले होते. यावेळी शिवसेनेने तेथे जाऊन तातडीने मदतीचा हात दिला आहे. पनवेल मधील अशोक बाग झोपडपट्टी परिसरात कोरोना रुग्ण आढळले. दाटीवाटीचा भाग असल्याने रोगाचा प्रादूर्भावाचा धोका तेथे मोठ्या प्रमाणावर आहे. रुग्ण सापडल्यावर बरेच दिवस तक्रार करूनही लोकप्रतिनिधी किंवा पालिका प्रशासन यांनी काहीच उपाययोजना केल्या नाही. याबाबत स्थानिक नागरिकांनी शिवसेना मा. नगरसेवक प्रथमेश चंद्रशेखर सोमण यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी शिवसेना स्थानिक पदाधिकारीलक्ष्मण पांचाळ, लक्ष्मण पाटील, मंदार काणे, प्रसाद सोनवणे, केदार कोशे यांच्या साथीने संपूर्ण परिसर फिरून तेथील परिस्थिती पहिली आणि महापालिकेकडे याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत प्रशासनाशी संपर्क करत संपूर्ण भाग सॅनिटाइझ/डीसइनफेक्ट करून घेतले. त्याचप्रमाणे या भागातील गरजूंना आता जीवनावश्यक वस्तूंचे वाटप ही करण्यात येणार आहे. यासाठी पनवेल महानगरपालिकेचे उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी विशेष सहकार्य केल्याचे मा.नगरसेवक प्रथमेश चंद्रशेखर सोमण यांनी यावेळी सांगितले.






Be First to Comment