वृद्ध महिलेची चेन लांबविली : ट्रान्सपोर्ट कार्यालयाचे शटर उचकटून चोरी 🔷🔶🔷
सिटी बेल लाइव्ह । पनवेल । वार्ताहर । 💠🌟💠

मोटारसायकलीवरून आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी एका 64 वर्षीय महिलेच्या गळ्यातील 60 हजार रूपये किंमतीची सोन्याची चेन जबरीने खेचून पसार झाल्याची घटना नवीन पनेवल परिसरात घडली आहे.
नवीन पनवेल येथील से.-3 या ठिकाणाहून शिखा अशोक दत्ता (वय-64) या त्यांच्या पतीचे रक्त तपासणीचे रिपोर्ट घेऊन घरी पायी जात असताना अचानकपणे मोटारसायकलीवरून आलेल्यादोन अनोळखी व्यक्तींंपैकी पाठीमागे बसलेल्या व्यक्तीने त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन खेचून ते पसार झाले आहेत. याबाबतची तक्रार खांदेश्वर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

ट्रान्सपोर्ट कार्यालयाचे शटर उचकटून चोरी
एका बंद ट्रान्सपोर्ट कार्यालयाचे शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी एक लाख चाळीस हजार रूपयांची घरफोडी केल्याची घटना तालुक्यातील धरणा कॅंप येथे घडली आहे.
याठिकाणी सतनाम सिंग मोहर यांचे आयकॉनिक ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असून त्यांच्या कार्यालयाचे शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी 72 हजारांचे टायर, 48 हजारांचे इनव्हरटर बॅटरी व 20 हजार रूपये रोखरक्कम असा मिळून जवळपासएक लाख चाळीस हजार रूपयांचा ऐवज चोरून नेल्याची तक्रार तळोजा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.








Be First to Comment