अलिबाग विधानसभा मतदारसंघातील प्रकार 🔷🔶🔷
सिटी बेल लाइव्ह । रायगड । अमूलकुमार जैन । 🔶🔷🔶
सन 2018 साली महा-ई सेवा केंद्रात अलिबाग विधानसभा म्हणजे अलिबाग मुरूड चणेरा या तालुक्यातील मतदारांना स्मार्ट वोटर आयडी मतदारांना दयायचे असे सांगत उदय भास्कर सबनीस (रा. सबनिस आळी,मुरूड ता. मुरूड ) मंगेश चौधरी (जालना)यांनी रु.210000/- ची फसवणूक केल्याप्रकरणी संजीवनी संजय गाडे( रा. एकता अपार्टंमेंट रूम नं. 06 रेवदंडा विठोबा आळी ता.अलिबाग ) यांनी रेवदंडा पोलीस ठाण्यातफिर्याद दाखल केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, 16/01/2018 रोजी 12:50 वा.सुमारास फिर्यादी संजीवनी संजय गाडे यांना सन 2018 साली महा-ई सेवा केंद्रात अलिबाग विधानसभा म्हणजे अलिबाग मुरूड चणेरा या तालुक्यातील मतदारांना स्मार्ट वोटर आयडी मतदारांना दयायचे असल्याने त्यासाठी लागणारे किट लॅपटॉप, प्रिंटर, स्मार्टकार्ड, स्कॅनर, कोरे वोटर कार्ड हे आरोपी उदय भास्कर सबनीस यांच्या सांगण्यावरून फिर्यादी यांनी आरोपी मंगेश चौधरी यांचा अकाउंट क्रमांक 833784891 यावर एकूण 2,10,000 /-रूपये देना बॅक रेवदंडा येथून आरटीजीएस करून ट्रान्सफर केले असताना देखील यांतील आरोपीत यांनी आप आपसात संगनमत करून मतदारांना स्मार्ट वोटर आयडी दयायचे असल्याने त्यासाठी लागणारे किट लॅपटॉप, प्रिंटर, स्मार्टकार्ड, स्कॅनर, कोरे वोटर कार्ड आज पर्यंत कोणत्याही प्रकारचे साहीत्य न देता व सदरचे पैसे देण्यास टाळाटाळ करून फिर्यादी यांची आर्थिक फसवणुक केली.
याप्रकरणी आत्ता तब्बल दोन वर्षांनंतर रेवदंडा पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 78/2020 भा.दं.वि.क. 420 , 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोना/1242 ए.जी.साळुंखे हे करीत आहेत.
Be First to Comment