सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार । 🔷🔶🔷
नागोठण्यातील शांतीनगर भागातील रहिवासी आणि रायगड जिल्हा परिषदेच्या नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रातील सेवानिवृत्त आरोग्य सहाय्यक अनंतराव श्रीधर जोशी (वय ८०) यांचे अल्पशा आजाराने पनवेल येथील रूग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक विवाहित मुलगी यांच्यासह मोठा परिवार आहे.
दिवंगत अनंतराव जोशी हे नागोठणे शहरासह संपूर्ण रोहे तालुक्यात आण्णा जोशी म्हणून परिचित होते. नागोठण्यातील सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे ते पदाधिकारी होते. सेवानिवृत्ती नंतर नागोठण्याची ग्रामदेवता श्री जोगेश्वरी मातेच्या नवरात्रौत्सवात तसेच चैत्र पालखी सोहळ्याच्या वेळी ग्रामस्थांकडून वर्गणी गोळा करण्याचे कामही ते उत्साहाने करीत असत. नागोठणे टपाल कार्यालयात अल्प बचत प्रतिनिधी म्हणूनही ते कार्यरत होते. त्यामुळे त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.







Be First to Comment