Press "Enter" to skip to content

रायगडात काँग्रेसची जोरदार निदर्शने

कृषी विषयक धोरणांचा विरोध : हाथरस घटनेचा निषेध 🔶🔷🔷🔶

सिटी बेल लाइव्ह । रायगड । धम्मशील सावंत । 🔷🔷

केंद्र सरकारच्या नवीन कृषी विधेयकातील शेती आणि शेतकरी विरोधी धोरणांना विरोध करण्यासाठी तसेच उत्तर प्रदेशातील हाथरस बलात्कार घटनेचा निषेध करण्यासाठी आज रायगड जिल्हा काँग्रेस तर्फे अलिबाग एस. टी. स्टँड येथे निदर्शने करण्यात आली . यावेळी केंद्रातील मोदी सरकार व योगी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली .

जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माणिक जगताप यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात काँग्रेसच्या विविध सेलचे पदाधिकारी , कार्यकर्ते सहभागी झाले होते . उत्तरप्रदेश हाथसर येथील पीडित मुलीच्या कुटुंबियांची भेट घेण्यास गेलेल्या कॉग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी झालेल्या वर्तणुकीचाही यावेळी निषेध करण्यात आला .

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.