सिटी बेल लाइव्ह / भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे 🔷🔶🔶🔷
उत्तरप्रदेश मध्ये झालेल्या मनिषा वाल्मिकी हिच्या हत्येनंतर देशात त्याचे पडसाद उमटत असताना कर्जतमध्ये देखील संबंधित आरोपीना फाशीची शिक्षा देणेबाबत दलित युथ पँथर या संघटनेने या घटनेच्या निषेधार्थ आक्रोश आंदोलन केले .
आज दिनांक १ ऑक्टोबर २०२० रोजी कर्जतमध्ये भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे दलित युथ पँथर संघटना मैदानात ऊतरूण आक्रोश आदोलंन करण्यात आले .
जर हया आरोपींना फाशी दिली नाही तर दलित युथ पँथर संघटना उत्तरप्रदेश येथील योगी भाजप सरकारला दोषी धरून महाराष्ट्रात फिरून देणार नाही असा ईशारा त्यांनी या आक्रोश आंदोलनात दिला आहे .

सदर निवेदन कर्जत पोलीस ठाणे व कर्जत तहसील कार्यालय येथे देण्यात आले आहे . हे निवेदन देताना
दलित यूथ पँथर संघटनाचे,
पँथर टायगर सुशिलभाई जाधव,तसेच रायगड जिल्हा उपाध्यक्ष प्रविणभाऊ रोकडे,रायगड जिल्हा युवा अध्यक्ष अंकुश सुरवसे तसेच कर्जत तालुका अध्यक्ष अनिरुद्ध पवार,कर्जत तालुका महिला अध्यक्षा मिनाताई काकडे,कर्जत तालुका युवा अध्यक्ष रोशन गोतारणे, कर्जत तालुका युवा उपाध्यक्ष रोहिदास सोनावणे,कर्जत तालुका कार्याध्यक्ष रोहित ढोले,कर्जत तालुका सरचिटणीस गणेश नाईक,प्रसिद्धी प्रमुख कर्जत तालुका महेश साळवी,अशोक रोकडे,सागर खंडागळे, आदी पदाधिकारी होते. सदर निवेदन नायब तहसिलदार भालेराव यांनी स्वीकारले .








Be First to Comment