पनवेल महानगरपालिका सभापती संजय भोपी यांची मागणी
सिटी बेल लाइव्ह / खांदा काॅलनी #
दिनांक १२/०७/२०२० रोजीपासून पनवेल महानगरपालिकेच्या वतीने कोव्हीड १९ बाबतची दररोज प्रसिद्ध होणारी प्रेस नोट संक्षिप्त स्वरूपात जाहीर होत आहे. यामुळे परिसरातील कोव्हीड १९ रुग्णांची माहिती मिळत नसून आवश्य्क खबरदारी घेण्यात अडचण निर्माण होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. तसेच सध्या जाहीर होणाऱ्या संक्षिप्त प्रेस नोटमध्ये खांदा कॉलनी नोडचा उल्लेख नसल्याने स्थानिक रहिवाश्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून यामुळे निष्काळजीपणाचे प्रमाण वाढून कोव्हीड १९ रोगाचा प्रसार वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याकरिता नागरिकांच्या सोयीसाठी तपशीलवार प्रेस नोट जाहीर करावी वा तसे शक्य नसल्यास संक्षिप्त प्रेस नोटमध्ये खांदा कॉलनी नोडचा समावेश करून खांदा कॉलनी विभागातील आकडेवारी स्वतंत्रपणे जाहीर करण्यात यावी याबाबतचे लेखी निवेदन पनवेल महानगरपालिकेचे प्रभाग समिती ब चे सभापती संजय भोपी यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांना पाठवून तातडीने प्रेस नोटमध्ये आवश्यक ते बदल करण्याची विनंती केली आहे.






Be First to Comment