Press "Enter" to skip to content

मनसेचे राजेश साळुंखे यांच्या वाढदिवसानिमित्त नवीन झेंड्याचे अनावरण !

सिटी बेल लाइव्ह । भिसेगाव – कर्जत । सुभाष सोनावणे । 🔷🔶🔶🔷

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी पक्षात केलेल्या नवीन बदलांमध्ये पक्षाच्या झेंड्यात महत्वपूर्ण बदल केला होता .ज्या बदलांमुळे तरुणांच्या अंगी स्फूर्ती – बळ येईल असे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजमुद्रेला त्यांनी झेंड्यात स्थान दिले होते .
आज कर्जत शहर उपाध्यक्ष राजेश साळुंखे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आमराई येथील नामफलकाचे नव्याने उदघाटन करत या फलकावर राजसाहेबांनी मंजुरी दिलेल्या पक्षाच्या अधिकृत झेंड्याचे अनावरण केले .

यावेळी शहर उपाध्यक्ष राजेश साळुंखे यांसह संतोष विटकर , गणेश साळुंखे , संजय भिंगारे , रुपेश चव्हाण आदी मनसे पदाधिकारी उपस्थित होते .

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.