सिटी बेल लाइव्ह । नागोठणे (महेश पवार) : 🔶🔷🔷🔶
नागोठण्यातील खडकाळी भागातील जेष्ठ नागरिक व सार्वजनिक बाांधकाम विभातील निवृत्त कर्मचारी मारुती दशरथ ठोंबरे (बाबा) यांचे आज गुरुवार दि. १ आॅक्टोबर रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास खडक आळीतील त्यांच्या निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले आहे. मृत्यूसमयी ते १०० वर्षांचे होते.
त्यांच्या पश्चात अशोक, सुनिल व अनिल हेे तीन विवाहित मुलगे, एक विवाहित मुलगी सौ. मंंगल पाटील, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे यांच्यासह मोठा परिवार आहे. मारुती ठोंबरे बाबा यांच्या पार्थिवावर येथील अंबा घाटावरील वैकूंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांचे नातेवाईक, मित्रपरिवार, नागोठण्यातील नागरिक, समाज बांधव व खडक आळीतील ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.








Be First to Comment