अध्यक्ष जितेंद्र जोशी यांनी व्यक्त केली सर्वांच्याच सहकार्याची अपेक्षा
सिटी बेल लाइव्ह / धाटाव (शशिकांत मोरे)
रोह्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रुग्णांचा आकडा सुद्धा वाढत चालला आहे.दरम्यान रुग्णांना उपचारासाठी होणारा विलंब व रहदारीच्या त्रासाची समस्या लक्षात घेऊन रोह्यात कोरोना उपचार केंद्र उभारण्यासाठी कामगार उत्कर्ष सभा संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र जोशी यांनी व त्यांच्या सर्व सहकार्यानी पुढाकार घेतला असून याकरिता मात्र सर्वांच्याच सहकार्याची अपेक्षा असल्याचे मत व्यक्त करून याबाबतचे पत्र रोहा इंडस्ट्रियल असोसिएशनचे अध्यक्ष श्री बार्देशकर यांना त्यांनी आज दिले.
रोह्यात सुदर्शन पाठोपाठ एक्सेल,प्रिव्ही सह इतर कारखान्यात कोरोना बाधित रुग्ण वाढत असून काही जणांना संसर्ग झाल्याचे पहावायास मिळत आहे. त्याच बरोबर ग्रामीण भागातही कोरोना बाधितांचि संख्या वाढत आहे.शासकीय यंत्रणेवर याचा भार मोठा असल्याने काही रुग्ण दगावल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे.दरम्यान स्वॅप चाचणी व उपचारासाठी पुणे मुंबई येथे रुग्णांना हलविन्यात येत असल्याने रुग्णांची होणारी हेळसांड,उपचारासाठी लागणारा विलंब व रहदारीच्या त्रासाची समस्या लक्षात घेऊन रोह्यात कोरोना उपचार केंद्र उभारण्यासाठी कामगार उत्कर्ष सभा संघटनेने यामध्ये पुढाकार घेतला आहे.आज अध्यक्ष जितेंद्र जोशी यांनी रोहा इंडस्ट्रियल असो.चे अध्यक्ष श्री. बारदेशकर यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली व त्यांना याबाबतचे पत्र दिले. याकरिता तुम्हा आम्हा सर्वांच्याच सहकार्याची अपेक्षा असल्याचे ते म्हणाले.याकरिता लागणारा वैद्यकीय स्टाफ आम्ही कामगार उत्कर्ष सभा संघटनेच्या माध्यमातून उपलब्ध करून देणार आहोत तर मी माझ्या संघटनेतील सुदर्शन केमिकल,राठी डाय केम व धरमसी मोरारजी केमिकल कंपनीच्या व्यवस्थापन व कामगार प्रतिनिधींनीसह कामगारांनाही विश्वासात घेतले असून रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याबरोबर सुद्धा माझी चर्चा झाली आहे, त्यांनी सुद्धा याकरिता हिरवा कंदील दिला असल्याचे सांगितले.तर मी स्वतः इतर संबंधित कारखान्यांतील व्यवस्थापन,स्थानिक लोकप्रतिनिधी या सर्वाशी चर्चा करणार असल्याचेही जोशी यांनी सांगितले.तर याकरिता सर्वच ठिकाणी कोरोना बाबत जनजागृती करणे महत्वाचे आहे असे सांगून कोरोना उपचार केंद्राकरिता आपण प्रयत्न करू असे रोहा इंडस्ट्रियल असो.चे बार्देशकर यांनी सांगितले.
आज जितेंद्र जोशी यांनी घेतलेल्या भेटी दरम्यान धरमसी मोरारजी कंपनीचे व्यवस्थापकीय अधिकारी संभाजी जाधव यांनी आमच्या व्यवस्थापनाकडून या कोरोना केंद्राकरिता एक व्हेंटिलेटरची व्यवस्था केली जाईल असा शब्द दिला. याप्रसंगी संघटनेचे तालुका अधिकारी तथा सुदर्शन कामगार प्रतिनिधी सूर्यकांत मोरे,पुंडलिक कडु,राजेंद्र लाड़,सुनील बाविस्कर,विलास न्हावकर,धरमसी मोरारजी कामगार प्रतिनिधी देविदास देशमुख,मयुर मुंढे,दींडे,महाड सुदर्शन कामगार प्रतिनिधी
गणेश देशमुख यांसह.इतर सहकारी उपस्थित होते.
कामगार उत्कर्ष सभा संघटनेच्या माध्यमातून काही महिन्यापूर्वी रोह्यात झालेल्या आरोग्य तपासणी दरम्यान महिलांच्या स्तनांच्या कर्करोगा बाबत तपासणी करण्यात आली होती.तर आता संघटनेच्या प्रयत्नातून रोह्यात उभारण्यात येत असलेल्या कोरोना उपचार केंद्राचे कामगार वर्गातूनच नव्हे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.तर यामुळे रोहा तालुक्यातील बाधित रुग्णांना कोरोना आजाराचे निदान होणे,उपचार घेणे सोयीचे जाणार असून अनेकांना याचा दिलासा मिळणार आहे.कामगार उत्कर्ष सभा संघटनेचे अधक्ष जोशी साहेबांनी घेतलेला निर्णय स्वागतार्ह असून आम्ही सर्व प्रतिनिधी यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत असे उपस्थित कामगार प्रतिनिधी यांनी सांगितले.
कॅपशन
रोह्यात कोरोना उपचार केंद्र सुरू करण्यासाठी कामगार रोहा इंडस्ट्रियल असो.चे अध्यक्ष बारदेशकर यांना पत्र देताना कामगार उत्कर्ष सभा संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र जोशी शेजारी कामगार प्रतिनिधी(छाया:शशिकांत मोरे धाटाव)
Be First to Comment