मावशी आणि भाच्याचे जुळले सुत : गोष्ट पोहचली लग्नापर्यंत… वाचा या लव्हस्टोरी चे काय झालं पुढे 🔷🔷🔶🔶
सिटी बेल लाइव्ह / गुजरात : 🔶🔷🔷🔶
गुजरातमध्ये एक विचित्र आणि नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एक मावशी आपल्या 6 वर्षांनी लहान असलेल्या भाचाच्या प्रेमात पडली आहे. दोघांनी आजन्म एकत्र राहण्याच्या आणा भाकाही घेतल्या होता. दोघे लग्नही करणार होते, परंतु वेळीच दोघांच्या कुटुंबीयांनी त्यांना पकडले आणि त्यांचे लग्न रोखले.
गोध्रा तालुक्यात मीता (नाव बदलेले) ही विधवा महिला आपल्या माहरेच्यांसोबत राहत होती.
मीताला एक मुलगी आणि एक मुलगा आहे. मीताची दूरची बहीण कल्पना (नाव बदलेले) तिच्या जवळच राहत होती. कल्पनाचा घटस्फोट झाला होता. तिला एक 24 वर्षाची मुलगी आणि 18 मुलगा होता. किशोर असे या मुलाचे नाव. किशोर आणि मीताचे नाते हे भाचा मावशीचे. या दोघांची ओळख वाढली आणि ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले.
दोघे एकमेकांच्या प्रेमात होते, पण कुटुंबीयांना याबाबत काहीच कळाले नाही. एके दिवशी दोघेही घरातून पळून गेले. दोघीही घरात नसल्यांनी घरच्यांनी त्यांचा शोध घेतला. दोघी सौराष्ट्रमध्ये गेले असून लवकरच ते लग्न करणार असल्याचे कुटुंबीयांना कळाले. त्यांनी लगेच सौराष्ट्रमध्ये धाव घेतली आणि दोघांचे लग्न रोखले आणि त्यांना गावी परत आणले.
गावात समुपदेशकाने दोघांची समजूत काढली. हे अनैतिक असल्याचे दोघांना पटवून दिले. तेव्हा मावशीनेही किशोरपासून दूर राहण्याचे कबुल केले.








Be First to Comment