सिटी बेल लाइव्ह |उरण (घनःश्याम कडू) 🔷🔶🔶🔷
उरणमध्ये लोन देण्यासाठी वेगवेगळ्या फायनान्स कंपन्यांच्या शाखा उघडल्या आहेत. तरी अशा फायनान्स कंपन्यांकडून लोन घेताना ग्राहकांनी सावधानता बालगतच व्यवहार करावा अन्यथा तुमची फसगत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बँक लोन घेताना अनेक अटींचा सामना ग्राहकांना करावा लागत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना लोन मिळावा यासाठी अनेक फायनान्स कंपन्या उघडल्या आहेत. या फायनान्स कंपन्यांमध्ये सोने, जमीन, घरदार किंवा इतर तारण ठेवून त्वरित ग्राहकांना लोन दिला जात आहे. त्यामुळे या फायनान्स कंपन्यांकडे ग्राहकांचा ओढा वाढला आहे. याचाच फायदा घेऊन फायनान्स कंपनीकडून ग्राहकांची फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
उरणमधील भर नाक्यावरील एका नावाजलेल्या फायनान्स कंपनीमध्ये एकाने लोन घेण्यासाठी सोने तारण म्हणून ठेवण्यासाठी आणले होते. सदर सोने हे बनावट असल्याचे फायनान्स कंपनीमध्ये उघड झाले होते. याची त्यांनी फायनान्सच्या वरिष्ठ अधिकार्यांना माहिती देेऊन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची तयारी केली होती. परंतु सदर व्यक्ती एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी असल्याने फायनान्स कंपनीवर दबाव आल्याने त्यांनी तक्रार दाखल केली नाही. मात्र हीच व्यक्ती सर्वसामान्य असती तर त्याला जेलची हवा खायला लावली असती. यामुळे फायनान्स कंपन्यांवरील विश्वास कमी होण्याची शक्यता आहे.
बनावट सोना घेऊन त्यावर फायनान्स लोन घेण्याचा प्रयत्न होऊनही त्याची तक्रार होत नाही. मग एखाद्या ग्राहकांनी सोने तारण ठेऊन लोन घेतला असेल तर त्यातील सोने काही ग्रॅम सोने कशावरून काढत नसतील. तसेच अशाप्रकारे फसवणूक होऊनही फायनान्स कंपनी कोणतीही तक्रार दाखल करीत नसल्याने संशयाचे वातावरण निर्माण होत आहे. तरी उरणमधील फायनान्स कंपनीतर्फे लोन घेताना सावधानता बाळगावी.
Be First to Comment