सिटी बेल लाइव्ह / नागोठणे : 🔶🔷🔷🔶
येथील आंनदीबाई प्रधान महाविद्यालयाचे प्राध्यापक जयेश पाटील यांचे वडील तसेच अलिबाग तालुक्यातील चरी येथील मूळ रहिवाशी सेवा निवृत्त शिक्षक वसंत लक्ष्मण पाटील यांचे वयाच्या 80 व्या वर्षी अल्पशा आजाराने नागोठणे येथील निवासस्थानी निधन झाले.
शांत स्वभावाच्या वसंत पाटील यांच्या पार्थिवावर येथील वैकुंठ स्मशानभूमीत सायंकाळी अंत्यविधी करण्यात आला. त्यांच्या पश्चात पुष्पलता पाटील ही पत्नी, जयेश पाटील हा मुलगा,रेश्मा धुमाळ व अपर्णा म्हात्रे या दोन विवाहित मुली तसेच सून,जावई व नातवंडे असा परिवार आहे.








Be First to Comment