पालकमंत्री आदिती तटकरे यांनी केली पाहणी
सिटी बेल लाइव्ह / खांब-रोहे.(नंदकुमार मरवडे)
रोहे तालुक्यात दिवसेदिवस कोरोनाचा प्रकोप वाढतच चालला असून वाढत्या रूग्णसंख्येच्या द्रुष्टीने पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांनी तालुक्यातील कोकण कृषी विद्यापीठाचे कृषी महाविद्यालय, किल्ला येथे नव्याने कोविड सेंटर उभे करण्यासाठी कोणकोणत्या आवश्यक सोयीसुविधांची गरज आहे व तेथे कोविड रुग्णांसाठी अधिक उत्तम व्यवस्था कशा पध्दतीने करता येईल, याची पाहणी करून तेथील परिस्थितीचा आढावा घेतला.
तालुक्यातील वाढत्या रूग्णसंख्येच्या द्रुष्टीने पालकमंत्री आदिती तटकरे यांनी केलेल्या या आढाव्यामुळे व क्रुषी महाविद्यालयात कोवीड सेंटर उभे केले तर तालुक्यातील बाधित रुग्णांना त्याचा चांगलाच फायदा होईल.असे बोलले जात आहे. तर सध्या वाढत्या रूग्णांचा विचार करता चांगल्या सोईसुविधा व उत्तम व्यवस्था असणारे कोवीड सेंटयची गरज आहे.
क्रुषी महाविद्यालयात कोवीड सेंटर उभे राहावे यासाठी करण्यात आलेल्या पाहणीप्रसंगी प्रांताधिकारी डॉ.यशवंत माने, तहसिलदार श्रीमती कविता जाधव, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य प्राे.डॉ. पुजारी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अभय ससाणे, सहाय्यक गटविकास अधिकारी श्री.राठोड उपस्थित होते.






Be First to Comment