कोंडविल गावातील युवकांनी खैर तस्करीचा साफळा रचून केला भांडा फोड 🔶🔷🔷🔶
बेकादेशीर विक्री ७० ते ८० हजाराची तर सरकारी पत्रकानुसार दर ५ ते ६ हजार ? 🔶🔶🔷🔷
सिटी बेल लाइव्ह / श्रीवर्धन / रामचंद्र घोडमोडे 💠🌟🌟💠
श्रीवर्धन तालुक्यातील कोंड़ीवली गावाबाहेरील जंगलात खैर तस्करी होत असल्याचे काही ग्राम स्थानच्या नजरेत आले होते. कोंडविल गावातील ग्रामस्थांनी साफळा रचून रात्रीच्या वेळी खैर वाहतूक करनाऱ्या इसमांना पकडून तस्करीचा भांडा फोड केला आहे. ग्रामस्थांनी तोड करणाऱ्या इसमांना पकडून विचारपूस करून घेतलेल्या माहितीतून तोडलेले खैराचे नग हे ७० ते ८० हजार किमतीचे असून या पेक्षा जास्त खैर याआधी नेण्यात आला आहे. असे समजले.
फॉरेस्ट अधिकाऱ्यांनच्या कडून मिळालेल्या माहिती नुसार.. श्रीवर्धन फॉरेस्ट रेंज स्टाफ अधिकारी यांना खैर तोडी बाबत माहिती समजताच घटनास्थळी जाऊन मौजे कोंडविली येथील ग्रामस्थ यांचे समवेत मौजे कोंडविली येथील शेखाडी-श्रीवर्धन रस्त्यालगत टाटा सुमो गाडी क्र. MH 10 BM5312 या गाडीची तपासणी केली असता गाडीमध्ये खैर झाडांचे सोललेले ३९९ नग विनापरवाना वाहतुक करीत असताना जप्त करण्यात आले असून गाडी ड्रायव्हर व एक इसम यांची चौकशी करून यांचेवर वर गुन्हा दाखल करून भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम ४१/२ब,४२,२६ DEFH, व ६५-अ अन्वये कारवाई करण्यात आली.
या खैराच्या नागांची किंमत सरकारी दराप्रमाणे रु ५ ते ६ हजार एवढी आहे. पुडील तपास वनक्षेत्रपाल श्रीवर्धन मिलिंद राऊत, वनपाल बोर्ली पंचतन व स्टाफ .तपास करत असल्याचे फॉरेस्ट अधिकारी यांच्याकडून समजले .रायगड जिल्ह्यात अनेक वेळा खैर तस्करी झाल्याचे उघडकीस आले आहेत .यामागील कर्ता करवीता कोण ?कोणाच्या आशीर्वादाने हे धंदे चालत आहेत ? याची सखोल चौकशी होईल का ? अशी चर्चा श्रीवर्धन मधील जनता करीत आहे.
Be First to Comment