सिटी बेल लाइव्ह / संजय कदम / पनवेल #
पनवेल महापालिका क्षेत्रासह पनवेल ग्रामीणमध्ये रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्याचबरोबर मृत्यूचा आकडाही वाढत चालला आहे. दरम्यान आज पनवेल महापालिका क्षेेत्रात 154 तर 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच पनवेल ग्रामीणमध्ये 40 रुग्ण आढळून आले आहेेत. दरम्यान आज पनवेल शहरात 45 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे प्रशासनापुढेे कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्याचे आव्हान उभे राहिलेे आहे.
पनवेल महापालिका क्षेेत्रात आज आढळलेल्या नवीन रूग्णांमध्ये पनवेलमधील 45, कामोठ्यातील 24, नवीन पनवेलमधील 17, कळंबोलीतील 23, खारघरमधील 26, तळोजामधील 19 असे एकूण 154 रुग्ण आढळून आले असून कळंबोली आणि खारघरमधील व्यक्तींचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. तर पनवेल ग्रामीणमध्ये आदई 2, करंजाडे 6, नेरे 2, सुुकापूर 2, उलवे 4, विचुुंबे 5, वावंजे 2, वलप 2, ओवळे 2 तर अजिवली, पळस्पे, कोन, बामणडोंगरी, विहिघर, सांगुर्ली, कोळखे, गुळसुुंदे, पारगाव, भिंगारवाडी, शिरढोण, सोेमटणे, कोंबडभुजे येथे प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
पनवेल महापालिका क्षेेत्रात पनवेल येेथील 26, कळंबोली 13, कामोठे 20, खारघर 14, नवीन पनवेल 12, तळोजा 8 असे एकूण 93 रुग्ण तर पनवेल ग्रामीणमध्ये उलवे येथील 8, विचुंबे येथील 3, बामण डोंगरी येथील 3, कोळवाडी येथील 3, करंजाडे येथील 2, सुकापूर येथील 2, तसेच बारापाडा, देवद, नेरे, शिवकर, वावंजे, पालीखुर्द, विहिघर, डेरीवली, कोपर, नांदगाव, साई, येथील प्रत्येकी एका रुग्ण असे एकूण 32 रुग्ण पूर्णपणे बरे झाल्यानेे त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहेे.






Be First to Comment