
कोकणी मुस्लिम वेलफेअर फौंडेशन व स्टार फौंडेशन अग्रणी
सिटी बेल लाइव्ह / श्रीवर्धन / संतोष सापते #
निसर्ग चक्री वादळाने 3 जुन ला श्रीवर्धन मध्ये अक्षरशः थैमान घातले अनेकांचे संसार उघड्यावर आले, अनेकांनी उपजीविकेचे साधन गमावले , अनेक घर जमीन दोस्त झाले अनेक घरांचे कौले, पत्रे अक्षरशः पाला पाचोळा सारखी उडून गेली आहेत. शेतीचे अतोनात नुकसान झाले आहेत आंबा नारळ सुपारी काजू यांचे वाताहत झाली. अशा कठीण प्रसंगी विद्यमान सरकार व स्वयंम सेवी संस्थांनी गोर गरिबांचे दुःख कमी करण्याचे प्रयत्न केला आहे. कोकणी मुस्लिम वेलफेअर फौंडेशन व स्टार फौंडेशन यांचा माध्यमातून श्रीवर्धन तालुक्यातील विविध ठिकाणी जीवनावश्यक वस्तू आणि घर बांधणीसाठी आवश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले. अन्य, धान्य, कपडे, पत्रे इत्यादी बाबींचा वाटप निधी मध्ये समावेश करण्यात आला. निसर्ग चक्री वादळाने रायगड जिल्यातील सर्व तालुक्यांना नुकसान पोहचवलेले आहे. विशेषतः श्रीवर्धन, म्हसळा, माणगाव व मुरुड या तालुक्यात मोठ्या स्वरूपात नुकसान झाले. गेल्या वर्षी कोल्हापूर, सांगली या भागात पूर प्रसंगी संपूर्ण महाराष्ट्रातुन मदत त्यांना देण्यात आली. मात्र या वर्षी कोरोनामुळे आर्थिक घडी विस्कटल्या मुळे बाह्य जिल्यातील जनतेकडून नगण्य स्वरूपाची मदत रायगड वासीयांना मिळाली.
निसर्ग चक्री वादळाने रायगड जिल्ह्यातील अनेक तालुक्यात अक्षरशः हाहाकार उडवून दिलेला आहे. घर व शेती यांचे अतोनात नुकसान झालेले आहे.
मी व माझ्या सहकार्यांनी सर्व सामान्य व्यक्तींना आमच्या परीनं यथाशक्ती मदत केलेली आहे. कपडे, धान्य आणि घर दुसरतीचे साहित्य याचे वाटप केलेलं आहे. वाटप प्रसंगी जनतेने चांगले सहकार्य केले त्यामुळे त्यांचेही आभार….. डॉ. दानिश लांबे (संस्थापक स्टार फौंडेशन)






Be First to Comment