Press "Enter" to skip to content

लायन्स क्लब ऑफ उरणचे अध्यक्षपदी प्रकाश नाईक

सिटी बेल लाइव्ह / उरण(घन:श्याम कडू)

लायन्स क्लब ऑफ उरणच्या अध्यक्षपदी लायन प्रकाश नाईक एकमताने निवड करण्यात आली आहे. ४ जुलै रोजी पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यात सेकंड व्हाईस डीस्ट्रिक्ट गव्हर्नर एमजेएफ लायन मुकेश तनेजा यांनी त्यांना अध्यक्षपदाची शपथ दिली. लायन प्रकाश नाईक हे उरण लायन्स क्लबचे ४८ वे अध्यक्ष म्हणून विराजमान झाले आहेत. मावळते अध्यक्ष लायन डॉ.अमोल गीरी यांच्याकडून त्यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. यावेळी लायन डॉ.साहेबराव ओहोळ यांची सचिवपदाची, लायन संध्याराणी ओहोळ यांनी खजिनदार पदाची तर लायन नरेंद्र ठाकुर यांनी उपाध्यक्ष पदाची शपथ घेतली. बोडन ऑफ डायरेक्टर व इतर पदाधिकारी यांनीही शपथ घेतली.
याप्रसंगी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. क्लबचे पार्टनर मेंबर एमजेएफ लायन चंद्रकांत ठक्कर यांच्या हस्ते उरण एस. टी. डेपोच्या सर्व ३१० कर्मचाऱ्यांना “आरसेननक अल्बम ३०” गोळ्यांचे वाटप करण्यात आले. लायन नीलमा नारखेडे यांनी एका विद्यार्थ्यांनीचा चालू वर्षांचा शैक्षणिक भार उचलला. डायरेक्टर एमजेएफ लायन सदानंद गायकवाड यांच्या हस्ते हा धनादेश सुपूर्द करण्यात आला. लायन अबांरीन मुकरी यांच्यातर्फे १० गरजू कुटूंबांना अन्नधान्य वाटण्यात आले.
१९१७ साली स्थापन झालेली लायन्स क्लब इंटरनॅशनल ही जगातील सर्वात मोठी स्वयंसेवी संघटना असून २०० हून अधिक देशामध्ये कार्यरत आहे. संपूर्ण जगात लायन्सचे ४६,००० पेक्षा जास्त क्लब व १४ लाखांपेक्षा जास्त सदस्य आहेत. लायन्स क्लब ऑफ उरण १९७३ पासून तालुक्यात कार्यरत असून दरवर्षी गरजूसाठी मेडिकल चेकअप कॅम्प, खास महिलांसाठी कर्करोग निदान शिबीर, नेत्रदान शिबिर, मोफत डोळे तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर, अन्नधान्य, विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप, करियर मार्गदर्शन, गरजूंना संसार उपयोगी वस्तूंचे वाटप, पोलिसांसाठी सेफ्टी जॅकेट व मास्क वाटप, निराधार महिलांना शिलाई मशीन वाटप, दिव्यांगांना तीनचाकी सायकलचे वाटप, माता भगिनींसाठी हिरकणी कक्ष, कोरोना योध्याना औषध वाटप, वृक्षारोपण, उरण सागरी किनारा स्वच्छता मोहीम इत्यादी अनेक लोकोपयोगी योजना राबविल्या आहेत.
या कार्यक्रमाला कॅबिनेट मेंबर ला.नमिता मिश्रा, ला.राजेंद्र महानुभाव, आरसी ला. संजय गोडसे,झेडसी ला.डॉ. प्रीती गाडे, ला. सिंधू रामचंद्रन ला.योगेंद्र सिंह, ला.आलोक मिश्रा, एमजेएफ ला.संजीव अग्रवाल व ला.अॅड.दत्तात्रेय नवाळे हे प्रतिनिधी हजर होते. लायन शंकरभाऊ कोळी,ला.रवप्ना गायकवाड, ला.डॉ.संतोष गाडे, ला.समीर तेलंगे, ला.नीलिमा नारखेडे, ला.वंदना घरत, ला.अबांरीन मुकरी, ला.मनीष घरत, ला.ज्ञानेश्वर कोठावडे, ला.अवनी सरवैया, ला.शीतल तेलंगे ला.अल्पना अग्रवाल, ला. संगीता ठाकुर, ला. रुफिनसा ईनामदार व इतर सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.