सिटी बेल लाइव्ह / नितेश लोखंडे / महाड #
महाड ते मंडणग( राज्यवाडी-आंबडवे ) चौपदरीकरणच्या अनेक ठिकाणी राहीलेल्या अपूर्ण कामांमुळे महामार्गची झालेली दुरअवस्था स्थनिक लोकांना जिवघेणी ठरत असल्याचे दिसुन येत आहे. महत्वाचे म्हणजे अनेक दुचाकी व चार चाकींच्या गंभीर दुर्घटनांच्या बातम्या समोर येत असतानाही संबंधीत महामार्ग कंत्राटदार बेफीकीर आहे. या परिस्थितीला सर्वस्वी महामार्ग कंत्राटदार जबाबदार असल्याचा आरोप येथील रस्त्यालगत असलेल्या लोकांकडुन करण्यात येत आहे. कारण मागील वर्षभरा पासुन मंदावलेली कामाची गती, होत असलेले दुर्लक्ष पाहुन लोकांनी अनेकदा महामार्ग संबंधित बांधकाम अधिक्षक, निरीक्षकांना पुढे भविष्यात पावसाळी हंगामा मधील रस्त्याची होणारी बिकट परिस्थितीची अगोदरच जाणीव करून दिली होती. परंतु सर्वसामान्यांन्च्या शब्दांना महत्व न देता संबंधीत कंत्राटदारांनी फक्त स्वःताचा मनमर्जी कारभार सुरुच ठेवला असे म्हंटल तर चुकीचे ठरणार नाही.
कारण आज रोजी उद्भवलेली परिस्थिती भयंकर असल्याचे दिसुन येत आहे. सदर रस्त्यावरून चार चाकी वाहने चालविणे तर दुरचीच गोष्ट दुचाकी सुध्दा चालविणे अवघड झाले आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी दोन दोन फुटांचे मातीचे खड्डे पडल्याने अक्षरशहा रस्त्याच्या अपूर्ण राहीलेल्या कामाचा फज्जा उडाल्याचे दिसुन येत आहे.
या पुढे तरी चुकीचे नियोजनाचे व इतर कारणे न सांगता संबंधित बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर पावसाळी मोसमा पुरते तरी वाहने येण्याजाण्या करीता रस्त्याची डागडुजी करावी ही मागणी करण्यात येत आहे.
आठ महिन्यापासून हीच परिस्थिती पाहायला मिळते. रस्ता अर्धवट अवस्थेत आहे, पावसाळा सुरवात झाली असताना चिखलाचे साम्राज्य
बनले आहे. ठेकेदाराचे दुर्लक्ष होताना दिसतंय. जीवितहानी झाल्यानंतर प्रशासनाला जाग येईल का असा प्रश्न पडला आहे – त्रस्त वाहनचालक






Be First to Comment