Press "Enter" to skip to content

रायगडातील बहुजन चळवळीत उत्साह!

रिपब्लिकन पार्टी ॲाफ इंडियाच्या (आठवले) रायगड जिल्हा संपर्क प्रमुखपदी धर्मानंद गायकवाड यांची निवड!

सिटी बेल लाइव्ह / नेरळ- वार्ताहर #

रायगड जिल्ह्यातील बहुजन चळवळीत झोकुन काम करणारे धर्मानंद गायकवाड यांची नुकताच रिपब्लिकन पार्टी ॲाफ इंडीयाच्या (आठवले) रायगड जिल्हा संपर्क प्रमुखपदी रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले यांच्या आदेशाने नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान कोकण प्रदेश अध्यक्ष तथा रायगड जिल्हाअध्यक्ष जगदीशभाई गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली असलेला रिपाइंचा झंजावात पुढे धर्मानंद गायकवाड यांच्या निवडीने अधिक प्रबल होणार असल्याचे बोलले जात आहे.
या बाबत अधिक माहीती अशी की, रायगड जिल्हयात पत्रकार क्षेत्रात ठसा उमटविणारे धर्मानंद गायकवाड हे मागील काही महीन्यांपुर्वी जिल्ह्यातील सर्वात मोठ्या असणाऱ्या नेरळ ग्रामपंचायतीत अनुसूचित जमातीसाठी राखीव असणाऱ्या प्रभाग २ मध्ये सुमारे ६०० ईतक्या भरघोस मतांनी निवडुण आले होते. तसेच कर्जत तालुक्यांसह रायगड जिल्ह्यातील बहुजन चळवळीत दलीत पॅंथर कालापासुन ते सक्रीय आहेत. त्यामुळे रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदासजी आठवेल यांनी त्यांची रायगड जिल्हा संपर्क प्रमुख पदी नियुक्ती केली आहे. या निवडीने रायगड जिल्ह्यातील रिपाइं आणि बहुजन चळवळीत उत्साहाचे वातावरण पसरले आहे.
यावेळी नवनिर्वाचीत रायगड जिल्हा संपर्क प्रमुख धर्मानंद गायकवाड यांचे रायगड कोकण प्रदेश अध्यक्ष तथा रायगड जिल्हा अध्यक्ष भाई जगदीश गायकवाड यांनी स्वागत केले आहे. तसेच रायगड जिल्हयाचे संपर्क प्रमुख धर्मानंद गायकवाड यांनी पुढील वाटचाळीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी या निवडीने एकच उत्साह कर्जतसह संपुर्ण जिल्हयात पसरला आहे.
दरम्यान कर्जत तालुक्यांतील राजकीय वर्तुळात धर्मानंद गायकवाड यांचा एक वेगळाच ठसा असल्याने त्यांचा या निवडीने नेरळ शहर व कर्जत तालुक्यांसह जिल्ह्यातील विविध ठिकाणची राजकीय गणिते बदलणार असल्साचे बोलले जात आहे. रिपाइचे राष्ट्रीय नेते तसेच केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांचा संविधान निवासस्थानी कोकण प्रदेश अध्यक्ष तसेच रायगडचे जिल्हाध्यक्ष जगदीशभाई गायकवाड तसेच कर्जत तालुका अध्यक्ष भाई किशोर गायकवाड यांसह अनेक रिपाइं पदाधिकारी यांच्या उपस्थितीत रायगड जिल्हा संपर्क प्रमुख पदी धर्मानंद गायकवाड यांची नियुक्ती रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले आणि जगदीशभाई गायकवाड यांनी केली असुन तसे नियुक्ती पत्रही धर्मानंद गायकवाड यांना देणेत आले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.