Press "Enter" to skip to content

कळवे गावात चोरीच्या उद्देश्याने पती पत्नीवर हल्ला ! पत्नी गंभीर जखमी

सिटी बेल लाइव्ह / पेण ( राजेश कांबळे )

पेण तालुक्यांतील कळवे गावात चोरीच्या उद्देश्याने घुसलेल्या चोरट्यांनी पती आणि पत्नीवर हत्याराने वार केल्याने त्यात ते दोघेही जखमी झाले असून त्यापैकी पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. फिर्यादी अशोक पाटील हे कुटुंबासह कळवे गावात राहत असून शनिवारी राञी ते नेहमी प्रमाणे राञी जेवण करुन झोपले असताना मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास कोणी तरी अज्ञात इसमाने त्यांच्या घराचा पाठीमागील दरवाजा उचकटून घरात प्रवेश केला. आणि फिर्यादी यांच्यावर कोणत्या तरी हत्याराने वार करुन त्यांच्या गळ्यातील सहा तोळे सोन्याची चैन हिसकावून घेऊन सदर अज्ञात इसम पळून गेला. या हल्ल्यात अशोक पाटील व त्यांची पत्नी मंजुळा पाटील हे दोघेही जख्मी झाले असून त्यापैकी मंजुळा पाटील या गंभीर जख्मी झाल्या आहेत. त्यांच्यावर पेण येथील म्हाञे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. खताचे व्यापारी असणारे अशोक पाटील हे हमरापूर विभागात प्रसिद्ध आहेत. त्यांचा व्यवसाय देखिल मोठा आहे. त्यामुळे त्यांच्यावर झालेल्या या हल्ल्याचे वृत्त समजताच अनेकांना धक्का बसला असून या भागात खळबळ उडाली आहे. या घटनेचे वृत्त कळताच पेणचे उपविभागीय पोलीस अधिकारी नितिन जाधव व दादर सागरी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पवार यांनी तातडीची घटनास्थळी भेट दिली. व पोलिसांना तपासाबाबत मार्गदर्शन केले. घटनास्थळी रायगडचे श्वान पथक देखिल आणण्यात आले होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.