सिटी बेल लाइव्ह / खांब-रोहे (नंदकुमार मरवडे)
इतके दिवस कोरोनापासून दूर राहिलेल्या आंबेवाडी नाक्यावर कोरोना या महामारीने शिरकाव केला असून प्राप्त माहितीनुसार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील चार जणांना कोरोनाची लागण झाल्याने परिसरात भीतिदायक वातावरण निर्माण झाले आहे.
लागण झालेले चारही कर्मचारी हे पुरुष असून आपले कर्तव्य पार पाडीत असताना त्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे सांगण्यात आले आहे.ता.११ रोजी २ व १२ रोजी २ असे एकूण दोन दिवसात चारजण बाधित झाले आहेत.आंबेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी परिसरातील मोठ्या संख्येने रहिवासी वर्ग येत असल्याने आपले कर्तव्य पार पाडणारे आरोग्य कर्मचारीच कोरोनामुळे बाधित झाल्याने परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत चालला असल्याने स्वच्छता व सुरक्षितता पाळणे जास्त गरजेचे असल्याचे एकंदरीत परिस्थिती वरून दिसून येत आहे.कोरोनाचा आजार रोखण्यासाठी प्रत्येकाने खबरदारी घेऊन आपले व आपल्या परिवाराचे संरक्षण कसे होईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.तर मी सुरक्षित तर माझा परिवार सुरक्षित, परिवार सुरक्षित तर समाज सुरक्षित, समाज सुरक्षित तर देश सुरक्षित ही भावना प्रत्येकाने मनाशी बाळगणे गरजेचे आहे.अशाप्रकारे प्रशासनाकडून प्रबोधन करण्यात येत आहे.






Be First to Comment