कामार्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रात्रीच्या वेळी रुग्णांना परिचारिके कडुन ट्रीटमेंट : वैद्यकीय अधिकारी गैरहजर
सिटी बेल लाइव्ह / पेण/ प्रशांत पोतदार #
कामार्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रात्रीच्या वेळी जबाबदार वैद्यकीय अधिकारी हजर रहात नाहीत त्यामुळे रुग्णावर वेळेवर उपचार होत नसल्याने रुग्णांमध्ये संतापाची भावना आहे.शासनाने गोरगरिबांना मोफत आरोग्य तपासणी करण्यासाठी लाखो रुपयांचा निधी उपलब्ध करून देत सुसज्ज आरोग्य केंद्राची उभारणी करण्यात आली आहे परंतु या ठिकाणी रात्रीच्या वेळी वैद्यकीय अधिकारीच नसेल तर लाखो रुपये खर्च करून काय फायदा असा प्रश्न ग्रामस्थांतून उपस्थित केला जात आहे परंतु याठिकाणी रात्रीच्या वेळी वैद्यकीय अधिकारी गैरहजर राहत असल्याने परिसरातील रुग्णांची गैरसोय होत आहे.या ग्रामीण भागात आदिवासी बांधव राहत असल्याने त्यांना रात्रीच्या वेळेस वैद्यकीय उपचारासाठी पेण येथील उपजिल्हा रुग्णालयात जावे लागत आहे.त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या क्षेत्रातील मुख्यालयात उपस्थित राहात नसणाऱ्या कर्मचाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.या बाबत सविस्तर वृत असे की बुधवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास साप चावल्याने शरद जाधव(जावळी) हे ग्रामस्थ प्राथमिक आरोग्य केंद्रात आल्याने येथे वैद्यकीय अधिकारी नसल्याचे त्यांना दिसून आले तर त्यांना याप्रसंगी परिचारिकेने दाखल करुन घेतले परंतु रात्रीच्या वेळेत वैद्यकीय अधिकारी एकदासुद्धा फिरकले नसल्याचे जाधव यांनी पत्रकारांना सांगितले.ग्रामस्थांच्या या जटिल प्रश्नाकडे लोकप्रतिनिधी व स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांचेे मात्र दुर्लक्ष होत असल्याचे बोलण्यात येत आहे.






Be First to Comment