सिटी बेल लाइव्ह / मुकुंद रांजाणे / माथेरान #
माथेरान नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा प्रेरणा सावंत आणि गटनेते प्रसाद सावंत यांचे सुपुत्र सिद्धेश सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त येथील श्रीराम मंदिर परिसरात विविध फळा फुलांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन मुळे सर्वत्र आर्थिक मंदी असल्याने आपला वाढदिवस थाटामाटात साजरा न करता अत्यंत साधे पणाने आपला वाढदिवस साजरा करावा असे सिद्धेश यांनी सांगीतल्यावरून नगराध्यक्षा प्रेरणा सावंत आणि गटनेते प्रसाद सावंत यांनी आपल्या चिरंजीवाच्या म्हणण्यानुसार अनेक रोपांची लागवड केली आहे. यावेळी आरपीआय अध्यक्ष अनिल गायकवाड, नगरसेवक शकील पटेल, नरेश काळे,राजू जांंभळे,
अमोल चौगुले, आतिष सावंत, नितीन सावंत, उमेश सावंत, अजमुद्दीन नालबंद, समीर पन्हाळकर, गणेश घावरे,अनिल जांंभळे यांसह अन्य उपस्थित होते.






Be First to Comment