सिटी बेल लाइव्ह / गोवे-कोलाड (विश्वास निकम ) 🔶🔷🔷🔶
रोहा तालुक्यातील मौजे चिल्हे येथील चिल्हे येथील मारुती सूर्याजी महाडिक महाडिक यांचे निधन झाले आहे मृत्युसमयी ते ९५ वर्षांचे होते त्यांच्या निधनाने महाडिक कुटुंबीयांसह चिल्हे गावावर दुःखाचे डोंगर पसरले आहे कोरोना संसर्गामुळे त्यांच्या अंतविधीसाठी विविध सामाजिक क्षेत्रातील मोजकेच नागरिक उपस्थित होते तर अनेक जणांनी त्यांना मोबाईल द्वारे श्रध्दांजली अर्पण करत दुःख व्यक्त केले तसेच त्यांच्यावर मौजे चिल्हे येथील वैकुंठ धाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
मारुती सूर्याजी महाडिक हे उत्कृष्ट शेतकरी व कलींगड फळांची गावो गावी जाऊन विक्री करत असत तसेच बाबूं पासून ते टोपली सूप झाप तसेच व विविध प्रकारचे कलाकृती बनविण्याचा छंद व त्यातूनच ते काही व्यवसाय शेती बरोबरच जोड व्यवसाय म्हणून करत असत बांबूपासून विविध प्रकारच्या वस्तू बनविणारे व कलींगड फळांची विक्री करणारे महाडिक यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे आध्यत्मिक व धार्मिक कार्यक्रमाची मोठी आवड त्यांना होती त्यामुळे पांडुरंगाचे भक्त व नेहमीच त्यांच्या मुखात पांडुरंग विठ्ठल विठ्ठल म्हणत असत त्यामुळे ते पांडुरंग म्हणूनच ओळखले जात
होते तसेच सामाजिक कार्यात त्यांचा नेहमीच सहभाग त्याच बरोबर मनमिळावू व शांत स्वभावाने सर्वांनाच सुपरिचित होते ,
त्यांच्या पच्छात एक मुलगा एक मुलगी पुतणे सुना नातवंडे असा मोठा महाडिक परिवार असून त्यांचे पुढील दशक्रिया विधी
शनिवार ता.२६ सप्टेंबर तर उत्तरकार्य तेरावा मंगळवार ता.२९ सप्टेंबर रोजी त्यांच्या राहत्या निवस्थांनी मौजे चिल्हे येथे होणार असल्याची माहिती त्यांच्या कुटूंबियांकडून प्राप्त झाली आहे,







Be First to Comment