सिटी बेल लाइव्ह / उरण (सुभाष कडू) : 🔶🔷🔷🔶
मराठी चित्रपटांत अविस्मरणीय भूमिका साकार करण्याऱ्या जेष्ठ अभिनेत्री कै.सरोज सुखटणकर (आत्या) रा.रुई यांचे आज अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.निधनासमयी त्यांचे वय ८४ होते.त्यांना अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे २००६ साली चित्रकर्मी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.अश्या जेंष्ठ अभिनेत्री सरोजताई सुखटणकर यांना अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळा तर्फे अध्यक्ष मेघराज राजेभोसले,पदाधिकारी, संचालक आणि सेवकवर्ग यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
…….अल्प परिचय……….
कै.सरोजताई यांना पहिल्या पासूनच अभिनयाची अत्यंत आवड होती.सुरुवातीला वेगळं व्हायचय मला,मुंबईची माणसं,प्रेमा तुझा रंग कसा,अश्या अनेक नाटकात भूमिका केल्या.त्यानंतर बाई मी भोळी,कुंकवाचा करंडा, जोतिबाचा नवस, सून लाडकी या घरची, कौल दे खंडेराया, एकटा जीव सदाशिव, सोयरिक, अष्टविनायक, भिंगरी, सावज,सहकार सम्राट, भुजंग, तोतया आमदार ,धुमधडका, लेक चालली सासरला, कुलस्वामिनी अंबाबाई, इरसाल कार्टी, दे दणादण, बळी राज्याचे राज्य येऊ दे,अश्या अनेक मराठी चित्रपटामध्ये त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता.







Be First to Comment