तालुका कृषी अधिकारी उरण सौ. क्रांती चौधरी यांचे शेतकऱ्यांना कळकळीचे अवाहन
सिटी बेल लाइव्ह / उरण (अजित पाटील यांजकडून )
तालुका कृषी अधिकारी, उरण सौ. क्रांती चौधरी यांनी शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामामध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजना पिकासाठी वरदान केले असुन शेतकर्यांनी किमान हप्ता भरून पिकांचा व फळांचा विमा काढल्यास शेतकर्यांना मोठ्या प्रमाणात संरक्षित विमा रक्कम मिळते, म्हणुन बिगर कर्जदार शेतकर्यांनी राष्ट्रीयकृत बॅंका जिल्हा मध्यवर्ती बँक, आपले सरकार सेवा सुविधा केंद्र येथे विम्याची हप्त्याची रक्कम भरू शकतात. भातासाठी हप्त्याचा दर हेक्टरी रक्कम रु. ९१०/- म्हणजेच गुंठ्याला रू. ९ .१० ईतकी रक्कम भरावी लागणार आहे. तसेच नागली पिकासाठी हेक्टरी ४०० रक्कम रू. व गुंठ्याला ४.१० रू.,तसेच भात पिकासाठी संरक्षित रक्कम रू. ४५,५००/- तर नागली पिकासाठी रू. २०,०००/- एवढे सुरक्षा कवच मिळणार आहे. कर्जदार शेतकर्यांचा हप्ता ज्या बँकेतून पिक कर्ज घेतले आहे तीच बँक हप्ता भरणार आहे, म्हणुन फक्त बिगर कर्जदार शेतकर्यांनी हप्ता भारताना आधार कार्ड, भाडेपट्टी करार, पेरणी घोषणा पत्र स्वतः ने घोषित केलेले व स्वताच्या सहीचे, बॅंक खाते पुस्तक, ७/१२ उतारा, विमा फॉर्म माहिती भरलेला ई. कागदपत्रे सोबत आणणे गरजेचे आहे. विमा मिळण्यासाठी जोखमीच्या बाबी अपुरा पाऊस, पूर, भुस्खलन, चक्रीवादळ, पिक पेरणी पासुन ते पिक काढणी पर्यंत वरील कारणामुळे होणारे नुकसान, काढणी नंतर होणारे नुकसान, स्थानिक नैसर्गिक नुकसान ई. मुळे होणारे नुकसान संरक्षण कवच मिळते. शेवटचा हप्ता भरण्याची तारीख ३१ जुलै २०२० ही आहे. त्यामुळे ताबडतोब आपल्याला पिकाचा बँकेत किंवा आपले सरकार सेवा सुविधा केंद्रामध्ये हप्ता भरावा ही विनंती असे तालुका कृषी अधिकारी ऊरण सौ. क्रांती चौधरी यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे व काही अडचण असल्यास तालुका कृषी अधिकारी ऊरण कार्यालयात मंडळ कृषी अधिकारी श्री. नागनाथ घरत, कृषि पर्यवेक्षक श्री. नवनाथ गरड,श्री. प्रकाश कदम यांच्याशी संपर्क करावा, तसेच ग्राम पातळीवर सर्व कृषि सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा.






Be First to Comment