सिटी बेल लाइव्ह / मुकुंद रांजाणे / माथेरान : 🔶🔶🔷🔷
माथेरान शिवसेनेचे उप शहरप्रमुख तथा माथेरान नागरी सहकारी पतसंस्थेचे माजी सभापती, संचालक हेमंत बिरामणे वय(५२)यांचे निधन झाले. मागील काही दिवसांपासून कोरोनाशी झुंज देत असताना मुंबई मधील एका खाजगी रुग्णालयात आज दि.२२ रोजी दुपारी अखेरचा श्वास घेतला.त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, आई, भाऊ असा मोठा परिवार आहे.
हेमंत बिरामणे हे सर्वांशी नेहमीच हसतमुखाने वागत असत.येथील अश्वपालकांच्या न्यायहक्कासाठी नेहमीच पुढाकार घेत असत. त्यांचा मित्र परिवार सुध्दा खुप मोठा आहे. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.







Be First to Comment