आज नव्याने २७ रूग्ण : एकाचा म्रुत्यू
सिटी बेल लाइव्ह / कोलाड (कल्पेश पवार)
रोहे तालुक्यात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वाढत चालला असल्याने दिवसेदिवस कोरोना रूग्णांचा आलेख हा चढताच राहिला आहे.तर आज नव्याने २७ रुग्ण पाँझीटिव्ह सापडल्याने व त्यामध्ये एका म्रुत्यूची नोंद झाल्याने शहरासह ग्रामीण भागातील जनतेमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.
आज तालुका प्रशासनाकडून प्राप्त माहितीनुसार रोहे तालुक्यात आज नव्याने २७ रूग्ण सापडल्याने तालुक्याची एकूण रूग्णसंख्या २६७ वर पोहोचली आहे.आज रोहे शहरात ८ रूग्ण सापडले आहेत.तर नागोठणे, वरसे,भुवनेश्वर, आंबेवाडी,कोलाड, लांढर,निवी,आरे बु.वरवठणे,गावठाण पिंगळसई आदी ग्रामीण भागात १९ रूग्ण सापडले आहेत. सध्या ९८ रूग्णांवर उपचार सुरू असून १६६ रूग्ण बरे होऊन त्यांना डिस्चार्ज दिला आहे.
तालुक्यातील कोरोना महामारीचा ताप वाढत चालला असून सर्वत्र भितीदायक वातावरण पसरले आहे. तर प्रादुर्भाव रोखण्यासाठी रोहे शहर पुढील काही दिवसांसाठी लाँकडाऊन करण्यात आले आहे.कोरोनाचा आजार रोखण्यासाठी प्रत्येकाने खबरदारी घेऊन आपले व आपल्या परिवाराचे संरक्षण कसे होईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.तर मी सुरक्षित तर माझा परिवार सुरक्षित, परिवार सुरक्षित तर समाज सुरक्षित, समाज सुरक्षित तर देश सुरक्षित ही भावना प्रत्येकाने मनाशी बाळगणे गरजेचे आहे.अशाप्रकारे प्रशासनाकडून प्रबोधन करण्यात येत आहे.






Be First to Comment