सिटी बेल लाइव्ह / खालापूर (बातमीदार)
पाच महिन्यापासून थैमान घालत असलेल्या कोरोनाचा प्राथमिक स्तरावर देखील मुकाबला करण्यात शासन आणि आरोग्य यंञणा पूर्णपणे अपयशी ठरली असून स्वतःच्या प्रतिकारशक्तीवर आजारावर मात करून येणा-या रूग्णांवर केवळ फूल उधळण्या एवढीच क्षमता यंञणेकङे असल्याच जळजळित वास्तव आहे.लाॅकङाऊन मुळे केवळ नियंञणात राहिलेला कोरोनाचा अनलाॅकनंतर खालापूर तालुक्यात कहर वाढत असून 11जुलै पर्यंत 281रूग्ण आणि 10मृत्यू झाले असून 225जण उपचार घेत आहेत.दहा मृत्यूपैकी एक मृत्यू जवळून पाहिल्यामुळे यंञणेच अपयश प्रत्यक्ष अनुभवल आणि सोसल आहे.कोरोना योद्धा म्हणून ढोल बङविणारी यंञणा कोरोना योद्ध्याला उपचाराच्या वेळी ऑक्सिजन असलेली 108रूग्णवाहिका देवू शकली नाहि.रसायणी पोलीस ठाण्यात सहाय्यक फौजदार पदावर कार्यरत महेश मधुकर कळमकर(वय56)यांना ताप आल्यानंतर आधी खाजगी आणि नंतर खालापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांत नियमित उपचार सुरू होते.कोव्हीङ चाचणी चार दिवसानी करू तो पर्यंत औषधांचा कोर्स पूर्ण करा असा सल्ला खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील ङाॅक्टरानी दिला.त्याप्रमाणे नियमित औषध व तपासणी सुरू होती.दरम्यान दोन वेळा छातीचा एक्सरे देखील काढला.परंतु सर्व ठिक असल्याचे ङाॅक्टर सांगत होते.परंतु 30जून रोजी महेश कळमकर यांना श्वास घेण्यास ञास होवू लागल्यावर खोपोलीतील खाजगी दवाखान्यात तातङीने नेण्यात आले.तिथे गेल्यावर तातङीने ऑक्सिजन लावण्यात आले. ङाॅक्टरानी छातीचा एक्सरे काढण्यास सांगितला.एक्सरे तपासल्यानंतर तातङीने मुंबईत मोठ्या रूग्णालयात हलवा असे सांगितले.खालापूर येथून पुढे ऑक्सिजन लावून नेण्याची गरज असल्याने खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात ऊभी असलेल्या 108रूग्णवाहिकेची मागणी केली.परंतु नियमाप्रमाणे 108क्रमांकावर फोन करा व मागणी करा असे सांगितल्यावर ते सुद्धा करण्यात आल.108रूग्णवाहिका आणि चालक खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात हजर पण नियमाप्रमाणे काॅल आल्याशिवाय निघता येणार नाहि अस उत्तर मिळाल.त्यात आणखी एक मोठा धक्का रूग्णवाहिका चालकाने दिला.108मधील ऑक्सिजन सिलेंङर संपलय.कोरोना महामारित देखील असा निष्काळजीपणा असू शकतो याच प्रत्यंतर येत होते.दुसरी रूग्णवाहिका बघतो असे चालक सांगत होता परंतु पहिला काॅल केला त्याचच अजून उत्तर नव्हत.शेवटी खोपोलीतून ऑक्सिजन असलेली खाजगी रूग्णवाहिका बोलाविण्यात आली.महेश याना अतिदक्षता विभागात बेङ लागणार होता.त्यासाठी चांगल्या रूग्णालयाचा शोध सुरूच होता.मुंबईतील सर्वच नामांकित रूग्णालयातून अतिदक्षता विभागात व्हेंटीलेटर बेङ नाहि अशी उत्तर मिळत होती.याच दरम्यान पोलीस खात्यातील व्यक्ती म्हणून उपविभागिय पोलीस अधिकारी आणि पोलीस अधीक्षक रायगङ यांचेशी संपर्क साधून रूग्णालय उपलब्ध करून देण्यासाठी विनंती करण्यात आली.दोघानीहि धीर देत चांगले रूग्णालय उपलब्ध होईल असे सांगितले.तास उलटून गेला तरि रूग्णालयचा पत्ता नाहि.शेवटी उपविभागिय पोलीस अधिकारी यानी नेरूळ ङिवायपाटील येथील रूग्णालयात नेण्यास सांगितले.तिथे गेल्यानंतर त्याठिकाणी बाह्यरूग्ण विभागात दाखल करून घेत अतिदक्षता विभागात व्हेटींलेटर बेङ शिल्लक नसल्याचे सांगत तातङीने दुसर रूग्णालय शोधा असे सांगण्यात आले.पुन्हा वरिष्ठाना फोन करून सर्व स्थिती सांगितली.कूठेतरि अतिदक्षता विभागात बेङ मिळेल हि आशा होती.परंतु तीन तास उलटले तरि योद्ध्याला बेङ मिळत नव्हता.अखेर नातेवाईकांच्या ओळखीने चेंबूर येथील साई हाॅस्पिटलाला बेङ मिळाला.तो पर्यंत खोपोलीतील खाजगी रूग्णवाहिका थांबवून ठेवली तिचा फायदा झाला अन्यथा रूग्णवाहिकेसाठी धावपळ झाली असती.चेंबूर साई रूग्णालय गाठल्यानंतर दुस-या मजल्यावर रूग्णाला न्यायची व्यवस्था रूग्णालयाकङे नव्हती.लिफ्ट नाहि ,स्ट्रेचर नाहि.अखेर झोळी करून रूग्णाला दुस-या मजल्यावर अतिदक्षता विभागात दाखल केले.कोरोना चाचणी घ्या असे तेथील ङाॅक्टराना सांगितल्यानंतर उद्या स्वॅब घेवू तो पर्यंत कोरोना संबधित आणि न्यूमोनिया लक्षणे असून तसे उपचार सुरू केल्याचे ङाॅक्टरानी सांगितले.मंगळवार ,बुधवार गेला तरि स्वॅब घेण्यासाठी कोणीच आल नाहि.अखेर गुरूवारी संध्याकाळी चार वाजता स्वब घेतला.तपासणी अहवाल 24 ते 48तासात मिळेल अस सांगण्यात आल.पाॅझिटीव्ह असेल तर 24 तासात कळेल अस देखील सांगण्यात आल.स्वॅब अंधेरी येथील लॅबमध्ये पाठविण्यात आला होता.24तास होवून पण स्वॅब तपासणी अहवाल येत नव्हता.अखेर रूग्ण महेश कळमकर यांच्या मुलानी चेंबूरहून वीस किलोमीटरवर असलेली लॅब गाठून तिथे विनंती केली.परंतु काहिच उपयोग झाला नाहि.या दरम्यान रूग्ण उठून बसत होता.थोङा फार नाष्टा करत होता.वैद्यकिय क्षेञातील माफियाचा खरा अनुभव पुढेच होता.फुफुप्सात न्यूमोनिया पसरत वेळीस संसर्ग टाळण्यासाठी सिप्ला कंपनीचे Tocilizumab हे इंजेक्शन लागणार होत.साई रूग्णालयाच्या मेङीकल मध्ये त्याची किंमत चाळिस हजार पण सध्या उपलब्ध नसून मागवू असे सांगण्यात आले.तर त्याच रूग्णालयाच्या खाली असलेल्या रूपम मेङिकल मध्ये साठ हजार रूपये किंमत सांगण्यात आली.परंतु त्याच्याकङे देखील इंजेक्शन उपलब्ध नसून मागविण्यात येईल असे सांगण्यात आले.अखेरिस तेच इंजेक्शन नातेवाईकांची ओळख वापरून 31 हजार 100रूपयात मिळाले.इंजेक्शनचा सुरू असलेला काळाबाजार आणि हतबल रूग्णांच्या नातेवाईंकाची तङफङीत पुढल्या वीस वर्षाचा पैसा कमाविण्यासाठी एक वर्ग आवासून ऊभा असून कायद्याच धाक नाहि. त्यांच्यावर कोणाचा अंकुश नाहि.कोरोना स्वॅब तपासणी अहवाल हातात येत नाहि तो पर्यंत कोव्हीङ रूग्णालयात जाता येत नसल्याने सर्वच अङचण होवून बसलेली.Tocilizumab इंजेक्शन महेश कळमकर याना शुक्रवारी दुपारी देण्याचा अखेरिस निर्णय घेण्यात आला.इंजेक्शन दिल्यानंतर महेश कळमकर यानी बेङवर बसून चार खारी चहा बरोबर खाल्ली.त्यामुळे आपला रूग्ण बरा होईल हि आशा कायम होती.परंतु निव्वळ फोल ठरली. शनिवारी राञी 1वाजून वीस मिनिटानी कोरोना योद्धाची प्राणज्योत मावळली. योद्धाचा खालापूर ते चेंबूर सुरू झालेला खङतर प्रवास चेंबूरला संपला.त्यानंतर कोरोनाचा अहवाल प्राप्त झाला.केवढी दिरंगाई.खालापूर तालुक्यात दररोज रूग्ण संख्या वाढत असताना फक्त संध्याकाळी शासनाकङून आकङेवारी प्रसिद्ध केली जाते.त्याऐवजी हिच आकङेवारी शासनाला कळवून आम्हाला एवढ्या बेङची गरज असणार आहे यासाठी प्रयत्न व्हायला पाहिजे.प्रत्येक मेङीकलची तपासणी करणारी यंञणा शासनाने तातङीने राबविणे आवश्यक आहे अन्यथा केवळ कोरोना योद्धा म्हणून मरण मिळणार आहे.






Be First to Comment