सिटी बेल लाइव्ह / नागोठणे (महेश पवार) :
रायगडचे खासदार सुनीलजी तटकरे यांच्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त वणी ग्रामपंचायत मध्ये कोविड-१९ च्या काळात गावाच्या आरोग्यासाठी लढणाऱ्या वणी, काळकाई, गोयंडावाडी येथील आशा सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, पाणीपुरवठा कर्मचारी, सफाई कर्मचारी यांना विशेष मानपत्र, मास्क, मानधन देऊन गौरवण्यात आले. या कार्यक्रमासाठी वणी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. प्रगती दिपेंद्र आवाद यांच्यासह उपसरपंच महेंद्र हंबीर, सदस्या सौ. दिपीका वनकर, सदस्या सौ. क्रितीका मांडलुस्कर, सदस्या सौ. मालती हांबीर, सदस्या सौ. शेवंती पारधी, सदस्य हेमंत पारधी, दिपेंद्र आवाद, सुरेश पारधी, ग्राम सेविका निलिमा म्हात्रे, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, पाणीपुरवठा कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी आदि लोक उपस्थित होते.






Be First to Comment