Press "Enter" to skip to content

मेव्हण्यावर शस्त्राने वार करणाऱ्या भाऊजीच्या न्हावाशेवा पोलिसांनी आवळल्या मुसक्या

सिटी बेल लाइव्ह / उरण(घन:श्याम कडू) 🔶🔷🔶🔷

जेएनपीटी टाऊनशीप मधील शॉपिंग सेंटर मधिल सायली बाजारात आज सकाळी ११ वाजता सामान खरेदीच्या उद्देशाने येऊन आपल्याच सख्या मेव्हण्याला प्लास्टिक पिस्तूलाचा धाक दाखवून धारदार शास्त्राने सपासप वार करून पलायन करण्याच्या तयारीत असलेल्या आरोपी भाऊजीच्या न्हावाशेवा पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

मेव्हण्यावर जीवघेणा हल्ला करणारा भाऊजी, आरोपी प्रणव सामंत याला पकडून नेताना

दिवसाढवळ्या जेएनपीटी टाऊनशीप शॉपिंग सेंटरमध्ये अशा प्रकारे जीवघेणा हल्ल्याची घटना घडल्याने तालुक्यात खळबळ माजली आहे.

आरोपी प्रणव सामंत (30) राहणार विश्राळी नाका ,पनवेल याचे जगदीश वाणी यांची मुलगी सायली बरोबर २०१२ साली विवाह झाला होता. मागील काही महिन्यापासून आरोपीकडून त्याच्या पत्नीला त्रास होत असल्याने त्यांच्या त्रासाला कंटाळून सदर पत्नी मुलासह तिच्या माहेरी राहत होती.
आरोपीला स्वतःच्या मुलासही भेटण्यास दिले जात नव्हते. पत्नी व मुलापासून पासून दुरावलेल्या मेव्हण्याने आज आपला डाव साधत जेएनपीटी टाऊनशीप मधील शॉपिंग सेंटरमधील सायली बाजारात सामान खरेदीच्या उद्देशाने गेला होता. त्यावेळी गल्ल्यावर पत्नीचा भाऊ व आरोपीचा मेव्हणा बसलेला पहाताच त्याने प्लास्टिक पिस्तूलाचा धाक दाखवीत लोखंडी धारदार कोयता व सुरीने सपासप वार करून पळणाच्या तयारीत होता.

उपचार सुरू असलेला जखमी कुशल वाणी

त्यावेळी बाजारातील कामगारांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जखमी कुशल वाणी याला सावरत आरोपी प्रणव सामंत याला पकडले असता झटापटीत आरोपीच्या डोक्यातील हेल्मेट निघाले असता तो शेठचा जावई असल्याचे उघड झाले.

न्हावाशेवा पोलिस ठाण्याचे गुन्हे पोलिस निरीक्षक जगदीश शेलकर,सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश फुले व प्रकाश बोरसे या पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला लोखंडी धारदार कोयता,सूरी व प्लास्टिक पिस्तूलाच्या मुद्देमुलासह मुसक्या आवळत गुन्हा दाखल केला.

जेथे घटना घडली तो सायली बाजार

जखमी कुशल वाणी डोक्यावर व खांद्यावर याशिवाय शरीराच्या इतर भागात धारदार शस्त्राने वार केल्याने जखमी अत्यवस्थ झाला असून,त्यास पोलिसांच्या मदतीने तात्काळ वाशी नवीमुंबई येथील एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

घटनास्थळी सर्वञ पसरलेले रक्त

आरोपी विरोधात न्हावाशेवा पोलिस ठाण्यात भा.द.वि.कलम 307 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून,या प्रकरणी न्हावाशेवा अधिक तपास करीत आहेत. मात्र नेहमी गजबजलेला असलेल्या जेएनपीटी टाऊनशीप मधील शॉपिंग सेंटरमध्ये अशी घटना घडल्याने उरण तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.