सिटी बेल लाइव्ह / पनवेल (वार्ताहर) 🔶🔷🔶🔷
पनवेल शहरात कोरोना सोबत आता चोरांनी देखील दहशत निर्माण केली आहे. पनवेल शहर पोलीस करतात काय ? असा सवाल आता नागरिक विचारू लागले आहेत.
शहरातील जुना ठाणानाका पान टपरीसमोर धनाभाई वाघेला (वय-60) यांच्याकडे दोन अज्ञात इसम आले व त्यांना बोलण्यात गुंगवून त्यांच्याकडील सोन्याचे मणी मंगळसूत्र, अंगठी व इतर ऐवज असा मिळून जवळपास 34 हजारांचा ऐवज काढून घेऊन पसार झाले आहेत.
याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलिस ठाण्यात कऱण्यात आली आहे. आता पोलिस या आरोपींना लवकरात लवकर अटक करू शकतील का ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.







Be First to Comment