उरण शहरात कोरोना रूग्ण सापडलेला परिसर प्रवेश बंद फलक लावून कोरोनाबाधित क्षेत्र म्हणून घोषित

सिटी बेल लाइव्ह / उरण / रमेश थळी #
चींतेची बाब म्हणजे सुमारे २५ हजारहून लोकसंख्या असलेल्या उरण शहरात कोरोना रूग्ण दिवसें दिवस वाढत आहेत. या रूग्णांची आकडेवारी दररोज वृत्तपत्र,पोर्टल, सोशल मिडियावर उरण तहसिलदार कार्यालयातून प्रसिद्धीसाठी दिली जाते. या बरोबर परिसराचे नाव जाहीर करण्यात यावे अशी मागणी उरण शहरातील नागरिकांनी केली होती .या मथळ्याखाली सिटी बेल लाइव्ह ही बातमी ही प्रसिध्द केली होती. या बातमीची दखल शासकीय यंत्रणेने घेतली असून उरण शहरात ज्या परीसरात रूग्ण ४ असा उल्लेख दखल असतो परंतु हे रूग्ण उरण शहरातील ज्या परिसरात कोरोना रूग्ण आढळतात निदान तो परिसर कोरोनाबाधीत क्षेत्र घोषित करून प्रवेश बंद असा फलक त्या त्या परिसरात लावले जात आहेत. या बद्दल नागरिक सिटी बेल लाइव्ह ला धन्यवाद देत आहेत. आहे या फलकामुळे उरण शहरातील नागरिक सावधगिरी बाळगून काळजी घेत आहेत.






Be First to Comment