सिटी बेल लाइव्ह / खांब-रोहे (नंदकुमार मरवडे) 🔶🔷🔶🔷
रोहे तालुक्यातील आंबेवाडी गावच्या रहिवासी असणाऱ्या सुनिता काशिराम लोखंडे यांचे शनि.दि.१२ सप्टें. रोजी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले.म्रुत्यूसमयी त्या सुमारे ७० वर्षांच्या होत्या.
अतिशय शांत,प्रसन्न व्यक्तिमत्त्व व प्रत्येकाच्या सुख-दु:खप्रसंगी धावून जाणाऱ्या सुनिता लोखंडे यांच्या दु:खद निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होताना दिसत आहे. सध्या कोरोना महामारीचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता त्यांच्या दु:खद निधन प्रसंगी लोखंडे परिवारातील काही ठराविक आप्तस्वकीय, मित्र परिवार व ग्रामस्थ यांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन त्यांचे अंत्यविधी उरकण्यात आले.
त्यांच्या पश्चात एक मुलगा, मुलगी,सुन,जावई,भाऊ,नातवंडे असा परिवार असून त्यांचे दशक्रियाविधी सोम.दि.२१ सप्टें.तर अंतिम धार्मिकविधी बुध.दि.२३ सप्टें.रोजी आंबेवाडी निवासस्थानी होणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे.







Be First to Comment