सिटी बेल लाइव्ह / रोहे / नंदकुमार मरवडे : 🔶🔷🔶🔷
रोहे तालुक्यातील संभे गावचे रहिवासी व सामाजिक कार्यकर्ते सुधाकर सुडक्या सानप यांचे अल्पशा आजाराने वयाच्या ७० व्या वर्षी दु:खद निधन झाले.
संभे गाव व कोलाड विभागात एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांची विशेष ओळख होती,तर त्यांनी आपल्या हयातीत एमएसईबी मध्ये कोणतीही डिग्री संपादित न करता केवल मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर म्हसळा येथे २५ वर्षे तर रोहा येथे १० वर्षे अशी हेल्पर वायरमन ते फाँर्मन अशी सुमारे ३५ वर्षे अतिशय प्रामाणिकपणे आपल्या खात्याची सेवा केली.ते अतिशय नम्र व शांत स्वभावाचे होते.
सध्या कोरोना महामारीचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता त्यांच्या दु:खद निधन प्रसंगी सानप परिवारातील काही ठराविक आप्तस्वकीय, मित्र परिवार व ग्रामस्थ यांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन त्यांचे अंत्यविधी उरकण्यात आले.
त्यांच्या पश्चात एक मुलगा,पुतणे,तीन मुली,जावई,सुना,नातवंडे असा मोठा परिवार असून त्यांचे दशक्रियाविधी शुक्र.दि.२५ सप्टें.तर अंतिम धार्मिकविधी २७ सप्टें.रोजी संभे येथील निवासस्थानी होणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे.







Be First to Comment