सिटी बेल लाइव्ह / नागोठणे (महेश पवार) : 🔶🔷🔶🔷
नागोठणे येथील तरुण होतकरू उद्योजक, श्री दिनेश अॅटोमोबाईल व बाळाराम हॉटेलचे मालक, माजी लायन सभासद दिनेश बाळाराम धामणे (वय ४०) यांचे कोरोनाच्या जीवघेण्या आजाराने शनिवारी (दि. १९) मुंबईतील रुग्णालयात निधन झाले. त्यामुळे गेले १५ ते २० दिवस त्यांनी कोरोनाशी दिलेली झुंज अपयशी ठरली.
ऐन तारुण्यात दिनेश धामणे यांच्या अकाली निधानानाचे वृत्त समजताच त्यांचे मूळ गाव असलेल्या कोंडगावसह संपूर्ण नागोठणे परिसरात शोककळा पसरली. स्व. दिनेशशेठ धामणे यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन लहान मुले, भाऊ, बहीण, काका यांच्यासह मोठा परिवार आहे.
नागोठणे मधील एक नावाजलेले व मोठा मित्रपरिवार असलेले, सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे दिनेशशेठ धामणे हे तरुण उद्योजक म्हणून नागोठणे विभागात अल्पावधीतच नावारूपाला आले होते. नागोठणे विभागातील श्री. दिनेश आँटोमोबाईल्सचे व हाँटेल - बाळारामचे मालक, लायन्स क्लब नागोठणेचे माजी सभासद तसेच रात्री-अपरात्री आपले आँटोमोबाईल्सचे दुकान उघडून ट्रक व इतर वाहन चालक-मालकांना वाहनाच्या दुरूस्तीसाठी हव्या असलेल्या वस्तू देवून सर्वांना मदत करणारे, धामणे कुटुंबातील सर्वे-सर्वा असे स्व.दिनेशशेठ धामणे यांचे कोरोना महामारीमुळे निधन झाल्याने हा कोरोनाचा आजार अजून किती चांगल्या - चांगल्या लोकांचे जीव घेणार असा प्रश्न आता सर्वत्र उपस्थित होत आहे.
दिनेशशेठ धामणे यांच्या अकाली निधनाने नागोठणे परीसरासह सुधागड व रोहा तालुक्याला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.







Be First to Comment