Press "Enter" to skip to content

नागोठणेमध्ये अवैद्य मटका धंदा ऑनलाइन पद्धतीने सुरू : पोलिसांचे दुर्लक्ष


सिटी बेल लाइव्ह / रोहा/समिर बामुगडे 🔷🔷🔶🔶


नागोठणे गावामध्ये अवैद्य मटका धंदा ऑनलाइन पद्धतीने जोरात चालू पोलिसांचा दुर्लक्ष झाले आहे कि काय असा प्रश्न विचारला जात आहे.

नागोठणे गावामध्ये ऑनलाइन पद्धतीने अवैद्य मटका धंदा जोरात चालू असताना नागोठणे पोलीस स्टेशन चा दुर्लक्ष का ? असे तमाम नागरिकात चर्चा होत आहे. एक ते दीड महिन्यापूर्वी रोह्याच्या डिवाइस पी साहेब यांच्या पथकाने नागोठणे या गावी वरचा मोहल्ला याठिकाणी येऊन संबंधित व्यक्ती ह्यांना रंगे हात पकडून ताब्यात घेतले आणि नागोठणे पोलीस स्टेशन मध्ये घेऊन गेले आणि त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल केला आहे.

त्यानंतर काही दिवसातच पुन्हा व्हाट्सअप ऑनलाइन पद्धतीत अवैद्य मटका हा चालू आहे मटका मालक कोणाच्या वरदहस्ताने बिनधास्तपणे नागोठणे पोलीसांची कोणतीच भीती न बाळगता अवैद्य मटका धंदा जोरात चालवीत आहेत. याचे मुख्य कारण पोलीस यंत्रणाचा चाल ढकळपणा समजावे असेच नागरिकांत चर्चा होत आहे हे मटका बहादर मटका मालक यांना मनोमन खात्री झाली आहे की पोलिस यंत्रणा कडून आपले काहीच वाकडे होऊ शकत नाही.

मटका हा चालूच राहणार आहे याचा अर्थ मटका मालक पोलीस यंत्रणांना जुमानत नाहीत तसेच पुन्हा मटका चालू आज बंद उद्या पुन्हा चालू अशा बेधडक वागणूक व विचाराने मटके मालकांचा हृदय झीट व मजबूत झाला आहे सध्या कोरोना सारखे महामारी संकटात जागतिक मंदीचा सावट सर्वत्र लोकांवर पसरला आहे.

सर्वसामान्य गोरगरीब माणूस ज्याचा हातावर पोट आहे त्या कुटुंब प्रमुखाने पुढे फार इकडे तिकडे आपले हात हळून चार पैसे कमवून घरात घेऊन जाणे व मुलाबाळांचे पोट निर्वाह करणे सोडून मुलाबाळांचे पोट निर्वा करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी असताना मटका खेळण्याचा छंद असलेल्या कुटुंब प्रमुखाने मटका खेळून कुटुंब उपाशीपोटी ठेवण्याचा प्रकार करीत असतात गोर गरीब कुटुंब जागतिक मंदीने उद्धवस्त झालेला आहे त्यात आणखीन त्यात एक भर म्हणून अवैद्य मटका धंदा नागोठणे गावांमध्ये ऑनलाइन पद्धतीत व्हाट्सअप द्वारे चालू असल्याने मटका हौशी मटका खेळत असल्याने काही कुटुंब उध्वस्त होताना दिसत आहेत.

त्यापुढे इतर कुटुंब उध्वस्त होऊ नयेत तरी मटका अवैध धंद्यावर नागोठणे पोलीस स्टेशन कडून ऑनलाइन व्हाट्सअप द्वारे चालवीत असलेले अवैद्य मटका धंदा मालक व त्यांचे साथीदारांची सायबर क्राईम पद्धतीची चौकशी कायदेशीर पद्धतीने करून नागोठणे गावांमध्ये कायम स्वरूपी अवैद्य मटका धंदा बंद करण्यात यावा असे दबक्‍या आवाजात नागरिकांकडून बोलले जात आहे

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.