सिटी बेल लाइव्ह / नागोठणे (महेश पवार) : 🔶🔷🔷🔶
नागोठण्यातील गवळआळी भागातील रहिवासी, के.एम.जी विभागातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व निवृत्त मंडळ अधिकारी तसेच येथील गवळी समाजाचे प्रमुख मार्गदर्शक नारायण विठोबा चौलकर (वय ९०) यांचे शुक्रवार दि.१८ सप्टेंबर रोजी पहाटे चार वाजता त्यांच्या राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले.
नागोठणे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तसेच श्री अष्टविनायक सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष विलास चौलकर यांचे ते मोठे चुलते होत.
कै. नारायण चौलकर हे सर्वांच्या सुख- दुखःत धावून जाणारे व सर्वांशी प्रेमाने वागणारे व्यक्तिमत्व होते. कै. नारायण चौलकर यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, दोन मुली, पुतणे, जावई व नातवंडे असा मोठा परिवार आहे. कै. नारायण चौलकर यांची दशक्रिया विधी रविवार दि. २७ सप्टेंबर रोजी व उत्तरकार्य मंगळवार दि. २९ सप्टेंबर रोजी त्यांच्या राहत्या घरी होणार असल्याची माहिती चौलकर कुटुंबियांकडून देण्यात आली आहे.






Be First to Comment