सिटी बेल लाइव्ह / कर्जत : 🔷🔶🔷🔶
डिकसळ येथील महाराष्ट्राचे लाडके गायक आणि भारतीय बौद्ध महासभेचे तालुका सचिव शुध्दोधन किसन साळवी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. निधनसमयी त्यांचे वय 50 वर्ष होते.
कर्जत तालुक्यातील बौद्ध समाजाला गायनाच्या माध्यमातून ‘बुद्ध आणि धम्म’ सांगणारे डिकसळ येथील शुद्धोधन साळवी यांचे शुक्रवारी रात्री निधन झाले. सामाजिक कार्यासह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या विविध कार्यक्रमात ते नेहमीच सहभागी असत. शुक्रवारी रात्री त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र , उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले.
त्यांच्या पश्चात भाऊ, बहीण, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. तसेच, त्यांचे दूरदर्शनवरही कार्यक्रम झाले असून त्यांची गाणीही प्रसिद्ध आहेत.







Be First to Comment