सिटी बेल लाइव्ह / रायगड : अमूलकुमार जैन 🔶🔷🔷🔶
अलिबाग तालुका युवक काँग्रेसचे सरचिटणीस सुराराम माळी यांचे पिता मोहनलाल गुणाजी माली यांचे वयाच्या 67 व्या वर्षी अल्पसा आजाराने नवीमुंबई येथील खासगी रुग्णालयात निधन झाले आहे.
मोहनलाल गुणाजी माली हे रेवदंडा येथे मांडल रानी (जिल्हा पाली)राजस्थान येथून चाळीस वर्षांपूर्वी व्यवसायानिमित्त आले होते.रेवदंडा येथे त्यांचे लकी स्वीट मार्ट चे प्रसिद्ध दुकान आहे.
गेल्या महिन्यात त्यांना कोरोना या आजाराने ग्रासले होते त्यात त्यांनी कोरोना वर मात केली होती.मात्र त्यांना इतर आजार असल्यामुळे त्याच्यावर उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले.त्यांच्यावर रेवदंडा येथील वैकुंठधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्यामागे पत्नी,तीन मुले,सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे







Be First to Comment