Live to give ग्रुप कॉलेज ऑफ सोशल वर्क निर्मला निकेतन मुंबई यांच्या वतीने वाटप
सिटी बेल लाइव्ह / कोलाड (कल्पेश पवार ) ###
कोलाड विभागातील दोनशे आदिवासी कुटुंबाना दि.१० व ११ जुलै रोजी Live to give ग्रुप कॉलेज ऑफ सोशल वर्क निर्मला निकेतन मुंबई याच्या वतीने ताडपत्री वाटप करण्यात आल्या आहेत.
निसर्ग चक्रीवादळात रोहे तालुक्या सह कोलाड विभागात अनेकांची
घरे,कउले,पत्रे यांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहेत.त्यातच पाऊस ही सतत पडतं असल्याने व वरती घराला छपर नसल्याने आदिवासी बांधव संकटात सापडले होते,अशा परिस्थितीत गरिबांना मदतीचा हात म्हणून Live to give ग्रुप व कॉलेज ऑफ सोशल वर्क निर्मला निकेतन मुंबई यांच्या माध्यमातून प्रिन्सिपल डाॅ.लिडविन डायस व (P.R.O)Public Reltion Officer क्रिसटिन कपाडिया यांनी मेहनत घेऊन
खरबाच्या ४ वाड्या मिळून १५० कुटुंब नेहरूनगर १० वाकी वाडी ४० अशा २०० कुटुंबांना ताडपत्रीचे वाटप केले तर कोलाड वरसगावं मधील जीवनधारा संस्थेने ११००₹ प्रमाणे २१×१५ साईजच्या २०२००० रुपय खर्च करून ताडपत्री वाटप केल्या आहेत.
यावेळी निर्मला निकेतन कॉलेज चे B.S.W चे विद्यार्थी बेला भोसले ,सुहास सिद ,स्वयंसेवक समीर डुमणे,नम्रता वाघमारे ,जीवनधारा संस्थेचे प्रकल्प सहाय्यक हिलडा फर्नांडिस, रोहा चर्चेचे फादर डायगाॅ,जीवनधारा संस्थेचे कर्मचारी गुलाब वाघमारे ,सुवर्णा वेदक, आरोग्य विनारसी रवी जाधव,सुचिता वाघमारे ,उपस्थित होते.
तर आदिवासी बांधवांच्या वतीने जीवनधारा संस्था कोलाड,कॉलेज ऑफ सोशल वर्क निर्मला निकेतन मुंबई व Live to give यांचे आभार व्यक्त करण्यात आले .






Be First to Comment