Press "Enter" to skip to content

विंधणे चे माजी सरपंच नरेश जोशी यांचे निधन

सिटी बेल लाइव्ह / उरण :🔶🔷🔶🔷

विंधणे ग्रूप ग्रामपंचायतीचे तीन वेळा सरपंंच पद भूषविलेले आणि येथील शेकाप कार्यकर्त्यांचे मार्गदर्शक नेते नरेशजी जोशी यांचे आज दिनांक -१८ सप्टेंबर २०२० रोजी ह्दयविकाराच्या धक्क्याने आकस्मिक निधन झाले.

यांच्या पश्चात त्यांची पत्नी ,दोन मुलगे व एक सुन आणि त्यांचे कुटुंब असा मोठा परीवार आहे.

स्वर्गीय नरेश जोशी यांच्या जाण्याने शेतकरी कामगार पक्षातील द्रोणाचार्य हरपला. तसेच पक्ष निष्ठा व तत्व यांना सदैव अखेरच्या श्वासापर्यंत बांधून राहणारे ते नेते होते. जोशी साहेबांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही. साहेब तुम्ही आम्हा पामरांच्या चिरकाळ स्मरर्णार्थ राहाल…लाल सलाम

शोकाकुल :- पुरोगामी युवक संघटना उरण तालुका, उपाध्यक्ष – श्री.दिपक रामचंद्र मढवी
ग्रूप ग्रमापंचायत चिर्ले सरपंच सौ.प्रियांका दिपक मढवी,
शेतकरी कामगार पक्ष चिर्ले ,गावठाण व जांभूळपाडा व आघाडीचे सर्व कार्यकर्ते यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.