सिटी बेल लाइव्ह / पेण (राजेश कांबळे) 🔶🔷🔶🔷
देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पेण मध्येही दिवसेंदिवस रुग्ण आढळून येत आहेत. कोरोना लाॅकडाऊनच्या काळात महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये वीज बिलाच्या तक्रारी वाढतच आहेत पेण तालुक्यातील नागरीकांनाही मोठ्या प्रमाणात वीज बिल असल्याने पेणच्या कार्यालयात वीज बिलांच्या तक्रारींसाठी रोजच गर्दी होत आहे.
त्यातच मागच्या महिन्यात सदर कार्यालयातील काही कर्मचारी कोरोना रुग्ण आढळल्याने कार्यालयात कर्मचा-यांची संख्या कमी झाली आहे.
मात्र कोरोनाची कोणतीही भीती न बाळगता एमएसईबीचे अधिकारी उमाकांत सपकाळे हे येणाऱ्या नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी तसेच जास्त प्रमाणात आलेल्या वीज बिलांवर कशा पध्दतीने उपाय काढण्यात येईल यासाठी तत्परतेने काम करीत असल्याचे पाहता उमाकांत सपकाळे हेच खरे कोरोना योद्धे आहेत.
पेण तालुक्यातील अनेक संघटनांच्या वतीने सपकाळे यांना कोरोना योध्दा म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. तालुक्यातील येणाऱ्या नागरीकांबरोबर त्यांनी जिव्हाळ्याचे संबंध ठेवले असल्याने जेष्ठ नागरीक वृद्ध महिला यांच्या समस्या तात्काळ सोडविण्यासाठी ते सदैव आपल्या कार्यालयात उपस्थित असतात अनेकदा ग्रामीण भागातील वीज गायब होते त्यावेळी स्व:ता साईटवर जाऊन वीज लवकर कशी येईल या करीता प्रयत्नशील असतात अशा या महावितरणच्या अधिकाऱ्यांला शासनाने कोरोना योध्दा म्हणून सन्मानित करावे अशी मागणी होत आहे.






Be First to Comment