सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे (धम्मशिल सावंत) ###
सुधागडसह जिल्ह्यात अचानकपणे बेपत्ता होणाऱ्या नागरिकांच्या संख्येत वाढ होत असून पोलिसांपुढे सातत्याने शोध मोहिमेचे मोठे आव्हान उभे ठाकते. नुकतेच सुधागड तालुक्यातील गायमाळ आदिवासीवाडी येथून एक 23 वर्षीय तरुणी अचानकपणे बेपत्ता झाल्याची नोंद तिच्या नातेवाईकांनी पाली पोलीस स्थानकात केली आहे. त्यामुळे पोलिसांची वेगवान शोध मोहीम सुरू झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पाली पोलीस ठाणे मिसिंग र.नं. ७/२०२० मधील मिसिंग मुलगी कु.कविता बळीराम जाधव; वय: २३ वर्ष रा. गायमाळ आदिवासीवाडी ही दि. २७/०६/२०२० रोजी १०.३० वाजण्याचे पूर्वी कोणास काही एक न सांगता राहते घरातून कुठेतरी निघून गेली. ती अद्याप पर्यंत घरी परतली नाही. तिचे वर्णन अंदाजे पाच फूट उंची, वर्ण गोरा, अंगाने मध्यम, केस बारीक व काळे, डोळे काळे, वस्त्र मेहंदी रंगाचा टॉप, चॉकलेटी रंगाची लेगीज, मेहंदी रंगाची ओढणी, कानात साधी काळ्या रंगाची बारीक कुडी, पायात पैंजण व पांढऱ्या रंगाचा व काळे पट्टे असलेला सँडल असे बेपत्ता तरुणीचे वर्णन आहे. सदर वर्णनाची तरुणी कुणाला आढळून आल्यास तात्काळ पाली पोलीस स्थानकात दूरध्वनी क्रमांक 02142-242223 तसेच सूरज फडतरे पो.ना. मो.नं. 8237219231 यांच्याशी संपर्क साधून माहिती द्यावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे.






Be First to Comment