प्रधानमंत्री फसल विमा योजनेचे अर्ज देणार निशुल्क भरून : मोफत माहिती व मार्गदर्शन करणार ###
सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे.(धम्मशिल सावंत ) ###
रायगड जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी सुधागड तालुक्यातील निलेश शिर्के या तरुणाने अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. निलेश शिर्के प्रधानमंत्री फसल विमा योजनेचे अर्ज जिल्ह्यातील शेतकऱ्यांना निशुल्क भरून देणार आहेत. एवढेच नाही तर 24 तास या बाबतची माहिती व मार्गदर्शन देणार आहे. निलेश शिर्के हे नेहमीच सामाजिक बांधिलकी जपून प्रामाणिक व निस्वार्थीपणे जनसेवा करीत असतात. त्यामुळे त्यांच्या या सेवाभावी कृतिशील कार्यातून समाजातील तरुणांपुढे एक आदर्श उभा राहिला आहे.
रायगड जिल्ह्यातील एकाही शेतकऱ्याकडून विमा रक्कमेशिवाय कोणतेही जादा शुल्क घेतले जाणार नाही असे निलेश शिर्के यांनी सांगितले. ज्यांना विमा योजनेचे अर्ज भरायचे आहेत त्यांनी आपले आधार कार्ड व आपल्या बॅंक पासुबुकच्या पहील्या पानाचा फोटो व आपल्या ८ अ ची प्रत सोबत घेऊन यावे किंवा 7083648000 या क्रमांकावर Whatsapp करावी कींवा swayamdigital@gmail.com या email वर mail करावे. अधिक माहीतीसाठी 24 तास कधीही फोन करावा. रायगड जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. तसेच प्रत्येक फेसबुक वापरकर्त्याने आपल्या व आपल्या बाजुच्या शेतकऱ्यांना माहीती देऊन विमा काढण्यास सांगावे. असे आवाहन निलेश शिर्के यांनी जिल्हावासीयांना केले आहे. या योजनेनुसार गुंठा 10 रू खर्च करून तुम्ही नुकसान झाल्यास 450 रू नुकसान भरपाई मिळवू शकते. म्हणून जास्तीतजास्त शेतकऱ्यांनी विमायोजना काढणे गरजेचे आहे.






Be First to Comment